गोव्यातील दुर्गादास परब आणि त्यांचे उर्जा फाउंडेशन

पेडणे, सत्तरी, डिचोली तालुका तसेच बार्देशातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही मदत केली जाते.
Goa News | Urja Foundation | Durgadas Parab News
Goa News | Urja Foundation | Durgadas Parab NewsDainik Gomantak
Published on
Updated on

विद्यादान व अन्नदान हे सर्वात पवित्र दान मानले जाते. गरजू व होतकरु शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास आर्थिक अडचणी येऊ नयेत, यासाठी फुल नाही तर फुलाची पाकळी या भावनेतूनच, विर्नोडाचे सुपूत्र दुर्गादास परब यांनी व त्यांच्या मित्रपरिवांनी ‘उर्जा फाउंडेशन’ या सेवाभावी संस्थेची 2013 साली स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत 1209 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. (Goa News)

‘उर्जा फाउंडेशन’ तर्फे दहावीत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना ही आर्थिक मदत केली जाते. यंदा या संस्थेमार्फत 321 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 3 हजार रुपये मदत देण्यात आली. शालेय प्रवेश शुल्क भरण्यास त्यांना त्यामुळे मदत झाली.(Urja Foundation)

पेडणे, सत्तरी, डिचोली तालुका तसेच बार्देशातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही मदत केली जाते. यासाठी संबंधित शाळेचे प्राध्यापक, शिक्षकांची मदत घेतली जाते. ज्यांची आर्थिक स्थिती खरीच नाजूक असते, अशाच विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळते. प्रत्येक शाळेतील तीन विद्यार्थ्यांना ही मदत दिली जाते. (Durgadas Parab News)

Goa News | Urja Foundation | Durgadas Parab News
Susegad Stories: 'सुशेगाद' तून गोयंकारपणाच घेतलाय शोध

‘फक्त गोमंतकातीलच (Gomantak) नव्हे, तर देशविदेशातील दाते या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. मागील दोन वर्षे, कोविडच्या कारणास्तव हा उपक्रम बंद होता. या काळातही अनेक दाते समोर आले होते, परंतु कोविडमुळे (Corona) आम्हीच हा उपक्रम काही काळ बंद ठेवला. आमची विर्नोडातील टिफीन सेवा मात्र सुरुच होती’, असे दुर्गादास परब सांगतात.

दुर्गादास परब हे पेडणे (Pernem) तालुक्यातील विर्नोडा गावचे. त्या आपल्या गावातील एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यानी टिफिन सेवाही सुरू केली आहे. ज्यांची मुलं कामधंद्यानिमित्ताने बाहेरगावी असतात किंवा ज्या ज्येष्ठांवर परिस्थितीने एकटेपण लादलंय, अशा लोकांना स्वतः स्वयंपाक करुन जेवावं लागतं. कधीकधी कंटाळा येऊन ते जेवणही करत नाहीत, उपाशी किंवा अर्धपोटीच राहतात.

त्यांचा जेवणाचा तरी प्रश्न सुटावा, निदान त्यांना दोन वेळेचे पोटभर जेवण मिळावं, यासाठी या लोकांना टिफिन घरपोच दिला जातो. या सेवेसाठी त्यांनी दोन महिलांची नियुक्ती केली आहे. ज्या जेवण बनवून ह्या लोकांच्या घरी पोचवतात. सप्टेंबर2019 मध्ये ही सेवी त्यानी सुरु केली. परब हे विर्नोडाचे सुपुत्र असले तरी ते म्हापसा (Mapusa) येथे वास्तव्याला असतात. हल्लीच विमा विकास अधिकारी या पदावरुन ते निवृत्त झाले आहेत.

सध्या दुर्गादास परब आपल्या मित्रपरिवारांना सोबत घेऊन ‘अक्षय ऊर्जा’ ही योजना बनवत आहेत. ही योजना पेडणे गावापूर्ताच मर्यादित असेल. तीन विद्यार्थ्यांची (Students) निवड करून त्यांना इयत्ता अकरावीपासून त्यांच्या पुढील शैक्षणिक जीवनासाठी मदत करण्यात येईल अशी माहिती दुर्गादास परब यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com