Diwali 2023: दिवाळी सणांमागील शास्त्र आणि भारतीय परंपरा (भाग 2)

या लेखमालेत आध्यात्मिक आणि धार्मिकदृष्ट्या दिवाळीचे महत्व विशद करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
Diwali
DiwaliDainik Gomantak

Diwali 2023: हिंदू, जैन, शीखपंथीय मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करतात. प्रत्येकाच्या दिवाळी मागच्या श्रद्धा, ऐतिहासिक घटना, कथा वेगवेगळ्या असल्या तरीही हा सण अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. थोडक्यात दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. आपल्या प्रत्येकाला आनंदी राहायचे असेल तर बुद्धीने, ज्ञानाने प्रज्वलित व्हावे लागेल.

रांगोळी:-

डॉक्टर मानसिक ताण घालवायचा असल्यास कागद आणि रंग घेऊन मनात जे विचार येतील त्याचे चित्र रेखाटण्याची थेरपी सुचवतात. दिवाळीतील रांगोळी काढणे ही परंपरा काहीस हेच सुचवते.

रांगोळी मांगल्याचं प्रतिक समजलं जातेच परंतु वैद्यकीय दृष्ट्या रांगोळी रेखाटण्याकडे थेरपी म्हणून पहिले जाते. सतत घरातली कामं करून, कष्ट उपसून दमलेल्या स्त्रियांना रांगोळी काढताना, त्यात रंग भरताना प्रसन्न वाटते. मन शांत झाल्यासारखे वाटते.

दीपावली:-

दिवाळीला ‘दीपावली’ देखील म्हणतात. दीपावली म्हणजे प्रकाश माला. दिवाळीच्या सणात दिव्यांची पूजा केली जाते. खरं तर या मागची आध्यात्मिक भावना लक्षात घेतली तर असं समजून येत की, माणसाच्या जीवनामध्ये अनेक दिशा, बाजू आणि पैलू असतात.

मात्र या सर्व घटकांवर प्रकाश माळेसारखा प्रकाश पडणे महत्वाचे असते. प्रकाशाच्या या माळा आपणास सांगतात की आपल्यातले अंगभूत चांगले गुण, चांगले पैलू यावर लक्ष देणे गरजेचे आहे.

कुबेरपूजन:-

लक्ष्मी पूजन, कुबेर पूजन हे दिवाळी सणांत प्रामुख्याने केले जाते. प्राचीन परंपरा आहे की आपण आपल्या समोर लक्ष्मी- कुबेर- गणपती यांच्या प्रतिमेसोबतच सोन्या चांदीची नाणी ठेवतो. थोडक्यात आपण आपल्या संपत्तीची पूजा करतो.

ही परंपरा आपल्याला एक मोलाचा सल्ला देते ती म्हणजे, संपत्तीतून मिळणारी तृप्ती आणि संपन्नतेकडे ध्यान दिलात तर संपन्नता वाढेल, समृध्द व्हाल. या परंपरेमुळे मी कृतज्ञ आहे, समृध्द आहे हा विचार मनात खोलवर रुजण्यास मदत होते.

बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा)

याला प्रादेशिक भाषेत; अन्नकुट (धान्याचा ढीग), पाडवा, गोवर्धन पूजा, बली प्रतिपदा, बली पद्यामी, कार्तिक शुक्ल प्रतिपदा अशी नवे आहेत. हा दिवस धार्मिक रीतीने पत्नी आणि पती; यांच्यातील बंध दर्शवतो.

काही हिंदू समुदायांमध्ये, पती आपल्या पत्नीला भेटवस्तू देऊन हा दिवस साजरा करतात. इतर प्रदेशांमध्ये, पालक नवविवाहित मुलीला किंवा मुलाला त्यांच्या जोडीदारासह सणासुदीच्या जेवणासाठी आमंत्रित करतात आणि त्यांना भेटवस्तू देतात. हा प्रकारही मनात आनंद, उत्साह निर्माण करणारा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com