सिनेमा अभिनय ऑडिशन....

कास्टिंग डायरेक्टर (Casting Director) तो आतापर्यंत होताच पण आत्ताच बहरू लागलेल्या या क्षेत्राचा भविष्यकाळ ओळखून तो अभिनेत्यांचे (Actors) व्यवस्थापन करण्याच्या प्रांतात प्रवेश करू पाहतोय.
Goa Audition
Goa AuditionDainik Gomantak

गोव्यात शूटिंग (Goa Shooting )दरमासी चालूच असतं. गोव्याबाहेरच्या प्रॉडक्शन हाऊसेसना गोवा शूटिंगसाठी आवडतोच पण आता स्थानिक पातळीवर देखील सातत्याने सिनेमा निर्मिती होत असल्याकारणाने शूटिंगचा औत्सुक्यपूर्ण देखावा गोव्यात खूप ठिकाणी पाहायला मिळतो. काही वर्षांपूर्वी गोव्याबाहेरच्या निर्मिती संस्था शूटिंगसाठी आवश्यक असलेला आपला पूर्ण संच बाहेरूनच घेऊन यायचे पण आता हळूहळू स्थानिक पातळीवर देखील त्यांच्या गरजा, अगदी पूर्णांशाने नसल्या तरी, पूर्ण होताना दिसत आहेत.

पणजीच्या (Panaji ) कला-संस्कृती (Art-culture) खात्याच्या साऊंड स्टुडिओत डबिंग केले जाते, वास्कोचा डॅनी गोम्स शूटिंगसाठी आवश्यक असलेल्या लाइट्स पुरवतो, जेवण पुरवणारे केटरर्स तयार झाले आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिनेमात काम करण्यासाठी स्थानिक पातळीवरून अभिनेत्यांचा देखील भरणा केला जातो.

एक काळ असा होता की शूटिंगसाठी ज्युनिअर आर्टिस्टदेखील त्या त्या संस्था मुंबई-मद्रास (Mumbai-Madras) वरून घेऊन यायच्या. आज परिस्थिती बऱ्यापैकी बदललेली आहे. गोव्यातल्या चांगल्या अभिनेत्यांची भरपूर नावे असलेली यादी कास्टिंग डायरेक्टर कडे तयार आहे आणि ती दिवसेंदिवस अद्ययावत होत चालली आहे.

गोव्यात कास्टिंग डायरेक्टर म्हणुन गेली काही वर्षे काम पाहणारा सिद्धेश नाईक एक चांगला सिनेमा संकलकही आहे. सिद्धेश म्हणतो, ‘गोव्यात थिएटरचा समृद्ध अनुभव असलेले चांगले अभिनेते खूप आहेत, फक्त काहीना पुरेसा अवकाश मिळालेला नाही. या 'गोमंतकीय' अभिनेत्यानंबद्दल आपले अनुकूल मत मांडताना सिद्धेश हे देखील सांगतो, ‘ते आपल्याकडून शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचा दृष्टिकोनही संपूर्णपणे व्यवसायिक असतो.’

अर्थात काही अपवादात्मक वेळा सिद्धेशला बॉलीवूडच्या (Bollywood)प्रेमात असलेले अभिनेतेही आढळतात जे अभिनयापेक्षा ग्लॅमरचा विचार जास्त करतात. ‘अभिनेत्यांनी अशा सिनेमात अगदी लहान भुमिका करून स्वतःवर खूष होण्यापेक्षा स्थानिक सिनेमातून का होईना पण चांगल्या भुमिका स्वीकारल्या हव्यात. सिद्धेश च्या मताप्रमाणे अभिनेत्यांनी आपले मन खुले ठेवायला हवे, संधी सतत दार ठोठावत असते. कास्टिंग डायरेक्टर या नात्याने सिद्धेशला अभिनयात गंभीरपणे आपले करिअर करू इच्छिणारे आणि कामाला प्राधान्य देणारे अभिनेते आवडतात.

ऑडिशन ही अभिनेत्यांच्या निवडीसाठी ची एक महत्त्वाची प्रक्रिया असते. सिद्धेश याबाबतीत अभिनेत्यांना विशेष सल्ला देतो- तो म्हणतो, ‘उगाचच समोरच्यावर प्रभाव टाकायला जाऊ नका. सैलसर आणि आरामदायक असा पेहराव करा. विनाकारण रुबाबदार बनण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःची वेगळी तयारी करून जा म्हणजे ऑडिशन स्क्रिप्ट जर वेळेवर हातात पडले नाही तरी तुमची तारांबळ उडणार नाही.

अलीकडच्या काळात कुणी फोटो (photo)मागत नाहीत त्यामुळे स्वतःचे काही व्हिडिओ (Video) ऑडिशनसाठी तयार करून ठेवा. ते उपयोगी ठरू शकतील. डायलॉग सिक्वेन्स किंवा स्वगते ऑनलाइन उपलब्ध असतात, त्यांचा उपयोग करुन तुम्ही असे व्हिडिओ तयार करून ठेवू शकता.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट सिद्धेश अभिनेत्याना सांगतो. ती म्हणजे, निर्मिती संस्था कोणतीही असो, सेटवर तुम्हाला ते सन्मानाने वागवतील याची खात्री करून घ्या. त्यांच्याकडून नीट माहिती मिळेल आणि अभिनेता म्हणून तुमचा आदर राखला जाईल याची अशी अपेक्षा बाळगा. मिळालेल्या वाईट वागणुकीमुळे अनेकजण नंतर सिनेमात काम करणे टाळतात. गोवा सिनेमा क्षेत्रात अजून नवखाच आहे आणि सिद्धेशच्या म्हणण्याप्रमाणे इथल्या या क्षेत्राचा योग्य विकास व्हायचा असेल तर आपल्याला ‘टिम’ म्हणूनच पुढे जावे लागेल.

सिद्धेशने आतापर्यंत अनेक नवीन आणि प्रतिभावंत अभिनेत्या कलाकारांना संधी दिली आहे. कास्टिंग डायरेक्टर तो आतापर्यंत होताच पण आत्ताच बहरू लागलेल्या या क्षेत्राचा भविष्यकाळ ओळखून तो अभिनेत्यांचे व्यवस्थापन करण्याच्या प्रांतात प्रवेश करू पाहतोय. सिनेमात गंभीरपणे करिअर करू इच्छिणाऱ्या अभिनेत्यांनी सिद्धेशकडे जरूर संपर्क साधायला हवा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com