Gmail 'हे' सिक्रेट फीचर्स वापरल्यास कामे होतील सोपे

तुम्हीही जीमेलच्या माध्यमातून दिवसभरात खूप काम करत असाल तर या ट्रिक्स वापरून तुमचे काम सोपे आणि लवकर होऊ शकते.
Gmail
Gmail Dainik Gomantak

Gmail: आपण सर्वजण आपल्या ऑफिशिअल कामासाठी जीमेलचा वापर करतो. जीमेलमध्ये अनेक सीक्रेट फीचर्स आहेत ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. तुम्हीही जीमेलच्या माध्यमातून दिवसभरात खूप काम करत असाल तर या ट्रिक्स वापरून तुमचे काम सोपे आणि लवकर होऊ शकते.

पटकन मेल कसा टाइप करावा

जर तुमचे काम दिवसभर मेलवर करावे लागत असेल तर तुम्ही स्मार्ट कम्पोजची मदत घेऊ शकता. स्मार्ट कम्पोजच्या मदतीने तुम्ही तुमचा मेल शक्य तितक्या लवकर तयार करू शकता. या हॅकच्या मदतीने तुम्ही तुमचे काम लवकर आणि सोपे करू शकता. स्मार्ट कम्पोज उघडल्यानंतर तुम्हाला मेल लिहिण्यास मदत मिळेल. यामुळे शक्य तितक्या लवकर मेल लिहता येतो.

मेल कसा शोधावा

अनेक वेळा आपले जुने मेल्स शोधणे अवघड होते. पण मेलमध्ये सर्च बारचा पर्याय आहे. या सर्च बारमध्ये तुम्हाला तारीख टाकावी लागेल, त्यानंतर त्या तारखेला आलेले सर्व मेल तुम्हाला दिसतील. यामुळे सर्वात जुने मेल शोधायला फारसा वेळ लागत नाही.

मेल शेड्युल करणे

तुम्हाला आजच्या ऐवजी उद्या कोणताही मेल पाठवायचा असेल पण उद्या तुम्ही दिवसभर बिझी असल्याने तुम्हाला मेल लिहायला आणि पाठवायला वेळ नाही. अशावेळी तुम्ही तुमचा मेल शेड्यूल करू शकता. खूप कमी लोकांना माहित आहे की मेल देखील शेड्यूल केला जाऊ शकतो. कोणताही मेल लिहिल्यानंतर सेंडच्या पुढे शेड्यूलचा पर्याय दिसतो. तुम्हाला हा पर्याय निवडावा लागेल आणि तुम्हाला पाहिजे त्या वेळी तुम्ही तुमचा मेल शेड्यूल करू शकता. यानंतर मेल त्याच वेळी जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com