beetroot
beetrootDainik Gomantak

Fashion Tips: ग्लॉसी आयलायनरसाठी बीटच्या रसात मिक्स करा 'या' गोष्टी

Makeup Tips: महिलाच्या डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी काजळचा वापर करतात.
Published on

सर्व सौंदर्य उत्पादने एका बाजूला आणि काजळचे सौंदर्य एका बाजूला. कारण काजळचा रंग जरी काळा असला तरी कोणत्याही महिलेने तिच्या डोळ्यांना शोभले तर तिचे सौंदर्य पाहण्यासारखे असते. शतकानुशतके महिला डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी काजळचा वापर करतात.  

  • मार्केटमधील महागड्या काजळला करा बाय-बाय

आजच्या आधुनिक जीवनशैलीत जर तुम्ही लक्ष दिले असेल, तर सर्व वयोगटातील मुली किंवा महिलांच्या (Women) हँडबॅगमध्ये एक गोष्ट आढळेल ती काजळ आहे. आजकाल मार्केटमध्ये अनेक महागड्या आणि रंगीबेरंगी काजळ उपलब्ध आहेत, पण काळ्या काजळचे सौंदर्य अजूनही टिकून आहे. दुसरीकडे, मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या काजळमध्ये भरपूर रसायने आहेत. त्यामुळे महिला आणि मुलींमध्ये डोळ्यांशी संबंधित समस्याही पूर्वीपेक्षा वाढल्या आहेत.

मुली आणि महिलांमधील काजळची आवड पाहता, आज आम्ही तुम्हाला काजळशी संबंधित अशा काही टिप्स देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधील काजळवर अवलंबून राहावे लागणार नाही, तर तुम्ही स्वतःसाठी आयुर्वेदिक पद्धतीने काजळ तयार करु शकता. घरी बनवलेल्या काजळची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यामध्ये कोणतेही केमिकल नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

  • गुलाबी आयलाइनर बनवण्यासाठी बीटरूट एलोवेरा जेल मिक्स करा

जर तुम्हाला तुमच्या मेकअपसोबत (Makeup) नेहमी काहीतरी वेगळे करायला आवडत असेल. मग या टिप्स तुमच्या उपयोगाच्या आहेत. एक उत्तम आयलाइनर फॉर्म्युला फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला बीटरूट ज्यूस काजळ घरच्या घरी कसे बनवू शकता ते सांगणार आहोत. 

beetroot
Honeymoon Destinations : नोव्हेंबरमध्ये हनिमूनला जाण्याचा विचार करताय? तर ही आहेत सर्वोत्तम डेस्टिनेशन

यासाठी प्रथम अर्धा बीटरूट (Beetrout) चांगले बारीक करून घ्या. बीटरूटचा रस गाळून एका भांड्यात काढा. दुसऱ्या भांड्यात एक चमचा बीटचा रस घ्या आणि नंतर त्यात दोन चमचे एलोवेरा जेल घाला. दोन्ही नीट मिक्स करुन पेस्ट बनवा आणि मग मस्करा ब्रशच्या मदतीने ही पेस्ट डोळ्यांवर लावा. याचा एक फायदा असा होईल की या पेस्टचा तुमच्या डोळ्यांवर कोणताही दुष्परिणाम होणार नाही. दुसरा फायदा म्हणजे कोणी पाहिलं तर म्हणतील मरून कलरचे आयलायनर कुठून आणलं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com