Geyser Buying Tips: गीझर खरेदी करतांना 'या' गोष्टींची घ्या काळजी

हिवाळा सुरू झाला असून तुम्ही गरम पाण्यासाठी गीझर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
Geyser Buying Tips
Geyser Buying TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Geyser Buying Tips: हिवाळा सुरू झाला असून तुम्ही गरम पाण्यासाठी गीझर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. हिवाळ्यात गरम पाण्याचा वापर आंघोळ करण्यासाठी, कपडे किंवा भांडी धुणे यासारख्या अनेक कामांसाठी केला जातो. सध्या बाजारात विविध प्रकारचे आणि ब्रँडचे गीझर उपलब्ध आहेत. पण सर्वोत्तम गीझर खरेदी करतांना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे जाणून घेऊया.

योग्य डिझाइन

गीझर खरेदी करताना त्याचा आकार आणि डिझाइन लक्षात घ्यावा. बाजारात विविध आकारात गीझर उपलब्ध आहेत. तुम्ही ज्या ठिकाणी गीझर बसवणार आहात त्यानुसार गीझर खरेदी करावा.

योग्य प्रकार निवडा

गीझर खरेदी करतांना योग्य प्रकार निवडावा. गीझरचे स्टोरेज गिझर आणि इन्स्टंट गीझर असे दोन मुख्य प्रकार आहेत. स्टोरेज गीझर पाणी गरम करून टाकीमध्ये साठवते, तर इन्स्टंट गीझर आवश्यकतेनुसार पाणी गरम करते. इन्स्टंट गीझर हे स्टोरेज गिझरपेक्षा अधिक ऊर्जा-कार्यक्षम असते. परंतु ते मोठ्या कुटुंबासाठी पुरेसे गरम पाणी पुरवू शकत नाहीत.

योग्य वॅटेज

गीझर वेगवेगळ्या वॅटेज रेटिंगसह बाजारात उपलब्ध आहेत. यामुळे पाण्याची टाकी आणि पाणी गरम होण्याची गती लक्षात घेऊन गीझर खरेदी करावा. कारण जास्त वॅटेज असलेले गीझर पाणी लवकर गरम करतात पण याचा परिणाम वीजबीलावर होऊ शकतो.

सेफ्टी फिचर्स

गीझर खरेदी करतांना सेफ्टी फिचरकडे लक्ष देणे गरजेचे आहे. गीझर खरेदी करण्यापुर्वी त्यात सेफ्टी व्हॉल्व्ह, ऑटो-कटऑफ यासारखे फिचर आहे की नाही तपासावे.

अधिकचे फीचर्स

जर तुमच्या बजेटमध्ये बसत असेल, तर टेम्परेचर कंट्रोल नॉब, टेम्परेचर गॉग आणि डिजिटल डिस्प्ले असे फीचर्स असणाऱ्या गिझरची निवड तुम्ही करू शकता. हे अनिवार्य नसले, तरी कामाचे फीचर्स आहेत.

Geyser Buying Tips
Gas Geysers: गॅस गीझर सुरू करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

गरम पाण्याची किती गरज आहे?

आपल्याला किती गरम पाण्याची गरज आहे याचा विचार करावा. हे तुमच्या कुटुंबातील सदस्य संख्या आणि वापरावर अवलंबुन असते. तुम्हाला जास्त गरम पाणी लागत असेल तर जास्त क्षमता असलेले गीझर खरेदी करावे. स्वयंपाकघरातील वापरासाठी किंवा दोघांसाठी इन्स्टंट गीझर खरेदी करावे. 2 ते 3 सदस्य असलेल्या कुटुंबांसाठी 6 लिटर पर्यंत असलेले गीझर खरेदी करावे. 4 ते 8 सदस्य असलेल्या कुटुंबांसाठी 35 लिटर पर्यंतअसलेले गीझर खरेदी करावे.

स्टार रेर्टिंग

एअर कंडिशनर आणि इतर विद्युत उपकरणांप्रमाणे गीझर देखील मोठ्या प्रमाणात वीज खर्च करते. यामुळे तुमच्यावर विजबीलाचे ओझे वाढु शकते. यामुळे किमान 4-स्टार ऊर्जा कार्यक्षमता रेटिंग असलेला गीझर खरेदी करण्यावर भर द्यावा.

विश्वसनीय ब्रँड्सची निवड

गीझरच्या बाबतीत विश्वसनीय ब्रँड निवडणे महत्वाचे आहे. यामध्ये ISI मार्क असणे गरजेचे आहे. जे त्यांची गुणवत्ता आणि सुरक्षितता दर्शवते. गीझर खरेदी करताना नेहमी मार्गदर्शक तत्त्वांचे पालण करावे आणि वॉरंटी कव्हरेज तपासावी.

वॉटर क्वॉलिटी

तुमच्या भागातील पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्षार असतील, तर त्याचा वाईट परिणाम तुमच्या गीझरवर होऊ शकतो. त्यामुळे एकतर गंजणार नाही असे मटेरिअल असणारा गीझर खरेदी करावा किंवा पाण्यातील क्षार कमी करण्यासाठी प्युरिफायरची मदत घ्यावी.

स्मार्ट कनेक्टिव्हिटी

आजकाल सर्व गोष्टी स्मार्ट होत असताना, स्मार्ट गीझर देखील उपलब्ध आहेत. यांना तुम्ही स्मार्टफोन App, अलेक्सा किंवा गुगल असिस्टंटच्या मदतीने देखील सुरू किंवा बंद करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com