Beauty Tips: एक चमचा दुधाचा वापर करून असा मिळवा चेहऱ्यावर Instant Glow

Beauty Tips
Beauty Tips Dainik Gomantak
Published on
Updated on

धूळ, प्रदुषण, माती यामुळे तुमच्या त्वचेच्या छिद्रांमध्ये धूळ आणि मातीचे कण जमा होतात. यामुळे तुमची त्वचा निर्जीव होते. त्वचा गुळगुळीत, ग्लोइंग (Glowing Skin) करण्यासाठी अनेक प्रकारच्या सौंदर्य उत्पादनांचा वापर केला जातो. जसं की फेस मास्क, फेस स्क्रब आणि फेस मसाज. (Face mask, scrub and massage) एकूणच त्वचेवर चमक आणण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि पैसाही खर्च होतो.

पण, भरसाठ पैसे खर्च न करता चेहऱ्यावर झटपट चमक मिळवू शकता. चेहऱ्यावर Instant Glow मिळविण्यासाठी तुम्हा फक्त एक चमचा दुध लागेल असे जर तुम्हाला सांगितले तर आश्चर्य वाटायला नको. हो ! फक्त एक चमचा दूध तुमच्या चेहऱ्यावर चमक आणू शकते. दूध त्वचेसाठी जीवनरक्षक म्हणून काम करते. (A spoon of milk helps your skin to glow)

Beauty Tips
Mhadai River बाबत कर्नाटककडून अवमान; तरी ही मुख्यमंत्र्यांचे मौन बधिर करणारे: विजय सरदेसाई

दूध क्लिन्झरचे काम करते

धूळ आणि मातीमुळे चेहऱ्यावर मृत पेशी जमा होतात, ज्यामुळे तुमचा चेहरा कोरडा होतो. फक्त पाण्याने तुमची चेहरा स्वच्छ करून भागत नाही. चेहरा स्वच्छ करण्यासाठी दुधाचा वापर केला जाऊ शकतो. हातावर एक चमचा दूध घेऊन चेहऱ्याला चांगले लावा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. चेहरा स्वच्छ आणि चमकदार होईल.

दूध मॉइश्चरायझरचे काम करते

कोरड्या आणि निर्जीव त्वचेसाठीही दूध मॉइश्चरायझरचे काम करते. दुधात लैक्टिक ऍसिड असते. जे तुमच्या त्वचेवर आर्द्रता टिकवून ठेवण्याचे काम करते. चेहऱ्याचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी चमचाभर दुधाने त्वचेला मसाज करा. असे रोज केल्यास चेहऱ्यावरील डाग कमी होतात.

Beauty Tips
Goa Rain Update: गोव्यासह कोकण किनारपट्टीवर येत्या 4 तासात मुसळधारेची शक्यता

दूध त्वचेला निरोगी बनवते

दुधात भरपूर पोषण असते. त्वचा निरोगी करण्यासाठी तुम्ही दुधाचा वापर करू शकता. वास्तविक दूध त्वचा स्वच्छ करते. त्वचेची छिद्रे उघडल्याने त्वचेला ऑक्सिजन मिळतो. मुरुमांसाठी दुधाचा रोज वापर केल्‍याने चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात.

दुधामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो

रोज कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्यास त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. यासाठी चेहऱ्यावर थंड दूध लावून पंधरा मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. तुमची चेहरा चमकदार आणि तजेलदार दिसेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com