General Knowledge: विमानाच्या खिडक्या गोलाकार का असतात? वाचा एका क्लिकवर

विमानाच्या खिडक्या एकसारख्या असण्यामागे असु शकते हे कारण.
General Knowledge
General KnowledgeDainik Gomantak

General Knowledge: विमानात प्रवास करण्याचा अनुभव खूप वेगळा असतो. अनेक लोकांसाठी विमानात बसणे देखील स्वप्नासारखे असते. विमानाची रचना खूप वेगळी असते. पण तुम्ही कधी विचार केला का की विमानाच्या खिडक्या गालाकार असतात. यामागे कोणते कारण आहे हे फारच कमी लोकांना माहिती असेल.

विमानच्या खिडक्या गोलाकरा असातात

तज्ज्ञाच्या मते तुम्ही कोणत्याही विमानाच्या खिडकीकडे पाहिल्यास तुम्हाला समजेल की त्याला कोपरा नसतो. यामागे कारण म्हणजे खिडकीला कोपरा नसल्यामुळे दबाव निर्माण होत नाही.

एखाद्या विमानाच्या खिडक्यांमध्ये दबाव निर्माण झाला तर ते तुटू शकतात आणि सर्व हवा विमानाच्या आत येईल. यामुळे अपघात होण्याची शक्यता असते.

आधी विमानाच्या खिडक्या चौकोनी का होत्या?

विमानाच्या खिडक्या आधी गोलाकार बनवलेल्या नव्हत्या. पण 1953 आणि 1954 च्या सुमारास झालेल्या अपघातात असे समोर आले की खिडक्यांचा चौकोनी आकार प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चांगल्या नाही. यामुळे विमानाच्या खिडक्यांमध्ये बदल करण्यात आला. आता जेव्हा तुम्ही पुढच्या वेळी विमानाने प्रवास कराल तेव्हा तुम्हाला निश्चितपणे लक्षात येईल की डिझायनरने विमानाच्या खिडकीसाठी गोल आकार का ठेवला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com