Genelia Deshmukh: शाकाहार अनेक असाध्य रोग बरे करण्यास सक्षम आहे. त्याचे फायदे आणि परिणाम खूपच आश्चर्यकारक आहेत. जगभरात असे अनेक लोक आहेत जे त्यांच्या आहारातून प्राण्यांशी संबंधित सर्व उत्पादने काढून टाकण्याचा पुढाकार घेत आहेत. इतकंच नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटीही शाकाहारी जेवणाकडे वळत आहेत. बॅालिवुडमधील प्रसिद्ध जोडपे जेनेलिया आणि रितेश देशमुख हे सोशल मीडियावर नेहमीच शाकाहारी आहाराचे जोरदार समर्थक राहिले आहेत. तो अनेकदा त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर शाकाहारी पदार्थांची जाहिरात करताना दिसतात.
अलीकडेच, जेनेलिया देशमुखने तिच्या मुलांसाठी एक स्वादिष्ट शाकाहारी ऑम्लेट बनवले आहे. ज्याचा फोटो तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिले आहे की हे ऑम्लेट भाज्यांपासून बनवले आहे. 'तुम्ही शाकाहारी अंडी बनवू शकत नाही' असे कोणी म्हटले आहे का? प्रयत्न करा, मग तुम्ही यशस्वी व्हाल. आणि तुम्ही यशस्वी होईपर्यंत प्रयत्न करत राहा,” असे जेनेलिया देशमुखने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
या फोटोत सिमला मिरची, गाजर आणि कांदे यांसारख्या भाज्यांनी (Vegetables) भरलेले एक अप्रतिम मसाला ऑम्लेट दिसते आहे. ते सामान्य ऑम्लेट सारखे दिसत होते पण ते पूर्णपणे शाकाहारी होते. तिच्या पुढच्या स्टोरीत, जेनेलियाने (Genelia Deshmukh)तिचा मुलगा राहिल ब्राऊन ब्रेडच्या दोन स्लाइसमध्ये केलेल्या सँडविच ऑम्लेटचा आनंद घेत असल्याचा फोटो शेअर आहे.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, "मुले फक्त त्यांच्या आईसाठी असं काहीतरी शोधून काढतात, ज्यासाठी त्यांच्या आईला नवीन शोध लावावा लागतो. अजब गोष्टी शोधाव्या लागतात. ज्याचा तिने यापूर्वी कधीही विचार केला नसेल." यावरुन समजते की एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच जेनेलिया एक यशस्वी गृहिणी देखील आहे.
मुलांना कसे आनंदित करायचे? हे जेनेलियाला चांगलेच ठाऊक आहे. यापूर्वी तिने आपला मुलगा रियानसाठी चॉकलेट पॅनकेक बनवले होता. याशिवाय जेनेलिया तिच्या पर्सनल लाईफशी संबंधित पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते. जेनेलियाने 'जाने तू या जाने ना' सारख्या हिट चित्रपटात काम केले आहे. पती रितेश देशमुखसोबत जेनेलियाने बनवलेले फनी रिल्सही खूप लोकप्रिय आहेत. अधिक माहितीनुसार, लवकरच ती रितेश देशमुखसोबत 'वेड' या मराठी चित्रपटात दिसणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.