Modak Recipe: झटपट बनवा 'हे' 3 प्रकारचे मोदक, बाप्पाच्या विसर्जनासाठी आहेत परफेक्ट

Ganesh Chaturthi 2023: बाप्पाला निरोप देण्याची वेळ जवळ आली असून गणेश विसर्जनासाठी तुम्ही हे झटपट मोदक तयार करू शकता.
Modak Recipe
Modak RecipeDainik Gomantak
Published on
Updated on

Modak Recipe Ganesh Chaturthi 2023: देशभरात गणेशोत्सवाचे वातावरण आहे. अनेक लोक दीड दिवसांचा तर काही लोक 5 दिवसांसाठी गणपती बसवतात. तर अनेक सार्वजनिक मंडळ 10 दिवस गणेशोत्सव साजरा करतात. या दहा दिवसात बाप्पाला विविध प्रकारचे नैवेद्य करतात.

तर काही लोक गणेश चतुर्थीला आणि अनंत चतुर्थीला खास मोदक बनवतात. तुम्हालाही गणेश विसर्जनाला बाप्पासाठी मोदक बनवायचे असेल तर तुम्ही पुढे सांगितलेल्या 3 प्रकारचे मोदक बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया मोदक बनवण्याची रेसिपी.

सुकामेवा मोदक

हे मोदक बनवण्यासाठी काजु, बदाम, खजुर, खोबर, विलायची पावडर घ्यावे. मोदक बनवण्यासाठी सर्वात पहिले खजुर मिक्सरमध्ये बारिक करावे.

नंतर सर्व साहित्य टाकून चांगले मिक्स करावे. नंतर मोदक बनवण्याच्या साच्यामध्ये तुप लावून हे मिश्रण टाकावे. तुमचे सुकामेवाचे मोदक तयार आहेत.

Dry Fruits Modak
Dry Fruits ModakDainik Gomantak

काजूचे मोदक

काजुचे मोदक बनवण्यासाठी काजु, पीठी साखर, विलायची पावडर, गरम दुध, केशर घ्यावे. हे मोदक बनवण्यासाठी सर्वात पहिले गरम दुधात केशरच्या काड्या मिक्स करावे. काजुची पेस्ट तयार करावी.नंतर चाळणीने गाळून एका भांड्यात काढावे.

नंतर त्यात साखर आणि विलायची पावडर मिक्स करावी. नंतर शेवटी दुध घालून पेस्ट बनवावी. नंतर हे मिश्रण साच्याला तुप लावून त्यात टाकावे. काजुचे चवदार मोदक तयार आहेत.

Kaju Modak
Kaju ModakDainik Gomantak

नारळाचे मोदक

नारळाचे मोदक तयाक करण्यासाठी किसलेले खोबरे, कंडेन्स्ड मिल्क आणि विलायची पावडर घ्यावे. हे मोदक बनवण्यासाठी हे तिन्ही साहित्य चांगले मिक्स करावे.

नंतर मोदकाच्या साच्याला तुप लावून हे सारण भरावे. तुमचे नारळाचे मोदक तयार आहेत.

Coconut Modak
Coconut ModakDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com