Ganpati Bappa आणतो शेजारी, मित्रांना एकत्र!

रंगतात गप्‍पांचे फड : शहरांत राहणारे गणेश चतुर्थीत येतात गावी
गणपती बाप्‍पा आणतो शेजारी, मित्रांना एकत्र!
गणपती बाप्‍पा आणतो शेजारी, मित्रांना एकत्र!Dainik Gomantak
Published on
Updated on

काणकोणमधील काही वाड्यांवरील युवा वर्ग नोकरी-व्‍यवसायानिमित्त मूळ गावापासून शहरात स्थलांतरित झाला आहे. ज्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण एकाच शाळेत घेतले ते लंगोटी यार पुढील शिक्षण व नंतर नोकरी-व्‍यवसायामुळे दुरावले, मात्र गावाकडील गणपती बाप्‍पा अशा लंगोटी यारांना दिवस का होईना एकत्र आणतो. यावेळी जुन्या आठवणी काढल्या जातात. गप्‍पांचे फडही रंगतात.गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी वाड्यावरील मुले दुपारची शिदोरी घेऊन माळरानावर जात होती. माळरानावरील निसर्गधन माटोळीसाठी एकत्रित करण्याची शर्यत मुलांमध्ये लागत होती. कोण जास्त फळे-फुले एकत्रित करणार याबाबत एकप्रकारे ती वाड्यावरील माटोळी स्पर्धा होती. या व अशा अनेक गमती जमती आजही समवयस्क मित्रांबरोबर वाटून घेताना भूतकाळ आठवतो, असे मोखर्ड येथील शिरीष पै यांनी सांगितले. मोखर्ड वाड्यावरील काही युवक नोकरी-व्यवसायानिमित्त अन्यत्र स्थायिक झाले आहेत

मात्र, चतुर्थी व अन्य सणानिमित्त ते गावात आल्यानंतर गप्पांचा फड रंगतो आणि चतुर्थीचे दोन दिवस कसे निघून गेले ते कळतच नाही. परंतु, गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर ही परत मंडळी शहरांत गेल्यानंतर सुनेसुने वाटू लागते. आणि त्या दोन दिवसांची स्मृती ताजी राहण्यासाठी नकळत शब्द बाहेर पडतात, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’. ते याचसाठी की त्यानिमित्ताने परगावी असलेल्या जुन्या वाडेकारांची मैफल रंगात येते.

गणपती बाप्‍पा आणतो शेजारी, मित्रांना एकत्र!
Ganesh Chaturthi 2021: गणपती विसर्जन स्थळी जाणाऱ्या पायवाटेची साफसफाई

आगसवाड्यावरील सर्वच गणपती माशे येथील श्री निराकार देवालयात आणण्यात येतात. हे या वाड्याचे एकोप्याचे प्रतीक आहे. सुमारे तीस गणपती मिरवणुकीने वाजत गाजत देवालयात आणल्यानंतर पुरुष, महिला व बाल गोपाळ देवालयात फुगडी खेळतात. सुमारे पन्नास ते साठ गडी या फुगडीत फेर धरून नाचतात. मात्र, गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे त्यात खंड पडल्याचे येथील शरेंद्र नाईक यांनी सांगितले. देवालयाच्या अर्चकाकडून सामूहिक आरती करण्यात आल्यानंतर सर्व गणेशमूर्तींचे तळीत विसर्जन करण्‍यात येते. आणि सर्वजण दोन दिवसांची गोड स्मृती मनात व डोळ्यात साठवून पुढील गणेश चतुर्थीची आतुरतेने वाट पाहतात.

गणपती बाप्‍पा आणतो शेजारी, मित्रांना एकत्र!
Ganesh Chaturthi: लाडक्या बाप्पांला 'ही' फूले अर्पण करावी

आगसवाड्यावरील पंधरा-सोळा घरांचा एकोपा

लोलये पंचायत क्षेत्रातील आगसवाड्यावरील पंधरा-सोळा घरांचा एकोपा चतुर्थीच्या निमित्ताने डोळ्यात भरतो. हा वाडा चतुर्थीच्या दिवसांत गजबजत असतो. वाड्यावरील सर्वजण मिळून सर्वच घरांत जाऊन सामूहिक आरती करतात. त्यावेळी आमचे-तुमचे आजोबा घुमटावर थाप कशी मारायचे, घुमटाचा मोड घालण्यात त्यांचा हात धरणारे कोणीच नाहीत हे अभिमानाने त्यांचा मोठा झालेला नातू सांगतो. त्याच्याच सुरात सूर मिसळून दुसरा नातू आपले आजोबा समेळ वादनात कसे तरबेज होते याचे गुणगान गातो. समेळवर काड्या तरारण्यात ते पटाईत होते, असे तो सांगताना त्याच्या शेजारीच बसलेल्या त्याच्या वडिलांची छाती अभिमानाने फुलते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com