Ganesh Visarjan 2023: गणेश चतुर्थीपासून सुरू झालेला गणेश उत्सव आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर संपणार आहे. सार्वजनिक मंडळाव्यतिरिक्त विघ्नहर्ता गणेश प्रत्येक घरात असतो. काही लोक स्थापणेच्या तिसऱ्या, पाचव्या आणि सातव्या दिवशी गणेशाचे विसर्जन करतात तर काही जण दहा दिवस पूर्ण झाल्यानंतरच विसर्जन करतात. गणेश विसर्जन दरम्यान काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. या छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर बाप्पा तुम्हाला वर्षभर आशीर्वाद देईल. चला जाणून घेऊया गणेश विसर्जनाच्या वेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या.
बाप्पाची पुजा करावी
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनाच्या आधी विधीपूर्वक बाप्पाची पूजा करावी. नंतर एक लाकडी फळी आणून गंगाजलाने शुद्ध करून स्वस्तिक बनवावे.
मोदक अर्पण करावे
यानंतर लाल रंगाचे कापड पसरून चारही कोपऱ्यांवर पूजेसाठी सुपारी ठेवावी. त्यानंतर गणेशमूर्ती ठेवलेल्या ठिकाणाहून उचलून करत लाकडी फळीवर ठेवावे. यानंतर गणपतीसमोर फुले, फळे, मोदक ठेवून पुन्हा नवीन वस्त्रे अर्पण करून आरती करावी.
यानंतर जवळ ठेवलेल्या सर्व वस्तूं एकत्र करून गणेशाजवळ ठेवावे. आरतीनंतर 10 दिवस पूजेदरम्यान अनावधानाने झालेल्या चुकीची गणेशजींकडून क्षमा मागून प्रार्थना करावी. मग सर्वजण गणपती बाप्पा मोरयाचा जयजयकार देत बाप्पाला उचलून घरातून निरोप द्यावा.
घराबाहेर पडताना या गोष्टी ठेवा लक्षात
घरातून बाहेर पडताना बाप्पाला घरात फिरवावे आणि घराच्या मुख्य दारातून बाहेर पडताना बाप्पाचे तोंड घराकडे आणि पाठ बाहेरच्या दिशेने ठेवावे. यानंतर विसर्जनाच्या ठिकाणी न्यावे.
पुढच्या वर्षी लवकर या...
बाप्पाला विसर्जनस्थळी नेल्यानंतर पुन्हा एकदा कापूर लावून आरती करावी. सर्वांनी गणेशजींचे आदरपूर्वक विसर्जन करावे. तसेच माफी मागून पुढच्या वर्षी लवकर यावे ही विनंती करावी.
असे करा विसर्जन
जर तुम्ही घरी प्लॅस्टिकच्या टबमध्ये किंवा भांड्यात गणेश विसर्जन करत असाल तर संपूर्ण प्रक्रियेचे पालन करा. त्यानंतर विसर्जन करून ते पाणी घराच्या कुंडीत किंवा बागेत विसर्जित करा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.