Ganesh Chaturthi 2021: गणरायासाठी पूरग्रस्तांचीही लगबग
Ganesh Chaturthi 2021: गणरायासाठी पूरग्रस्तांचीही लगबगDainik Gomantak

Ganesh Chaturthi 2021: गणरायासाठी पूरग्रस्तांचीही लगबग

काहींनी गावातील मंदिराच्या प्रांगणात तर काहींनी कोसळलेल्या घराच्या जागीच मंडप उभारून गणेशमूर्ती पूजण्याची जागा तयार केली आहे.
Published on

जोरदार पावसामुळे उध्वस्त झालेल्या अनेक पूरग्रस्त कुटुंबांना यंदाच्या चतुर्थीला गणेशमूर्तीचे पूजन घराबाहेर करावे लागत आहे. काहींनी गावातील मंदिराच्या (Temple) प्रांगणात तर काहींनी कोसळलेल्या घराच्या जागीच मंडप उभारून गणेशमूर्ती पूजण्याची जागा तयार केली आहे. सरकारने ज्यांची घरे पूर्णपणे कोसळली आहेत, त्यांना 2 लाख व ज्यांची घरे साधारण कोसळली आहेत त्यांना 1 लाख व काहींना 50 हजारांची मदत जाहीर केली. काहींच्या खात्यात ही रक्कम पोचली तर काहींच्या घरात कुणाच्या नावावर धनादेश काढावा

Ganesh Chaturthi 2021: गणरायासाठी पूरग्रस्तांचीही लगबग
Ganesh chaturthi spcial outfit: 'या' प्रकारचे करु शकता स्टायलिश लूक!

याबाबत एकमत न झाल्याने खात्यात पैसे पोचले नव्हते. मात्र, कालच मुख्यमंत्र्यांनी सुमारे दिड कोटी रुपये मंजूर केले आहेत.

बोणकेवाडा-वांते येथील म्हादई पुराने घर जमीनदोस्त झालेल्या उत्तम गावडे या कुटुंबाने आपली यंदाची चतुर्थी त्याच ठिकाणी साजरी करण्याची तयारी केली आहे. यासाठी त्यांनी पडलेल्या घराच्या ठिकाणी तात्पुरता माटोव उभारून त्यात गणेश उत्सव साजरा करणार आहे.म्हादईच्या उजव्या तीरी या उत्तम व पांडुरंग अशा दोन्ही भावांचे मिळून एकच जुने मातीचे घर होते. या घरामध्ये ३ मुलांसहीत एकूण आठ माणसे राहतात. घर कोसळल्याने ही सर्व मंडळी आता शेजारील कुटुंबात राहतात आणि त्यांच्या घरातूनच आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. गणेश चतुर्थीच्या उत्सवाला खंड पडू नये म्हणून त्यांनी आपल्या पडत्या घराची ठिकाणी ही व्यवस्था केली आहे. त्यासाठी त्यांनी घराची कोसळलेली संपूर्ण माती बाजूला करून जागा सपाट केली. त्या ठिकाणी माटोव घातला आहे. त्या माटोवात एक टेबल घातले आहे व त्या टेबलवर गणपती पूजेला बसवला जाणार आहे. यंदा त्यांची चतुर्थी दीड दिवस असणार आहे.

दरम्यान, बोणकेवाडा हा दुर्घम भाग असल्याने घरासाठी आवश्यक सामान या ठिकाणी आणता येत नाही. त्यामुळे घर उभारणी प्रक्रिया सुरू केली नसल्याने त्यांना आणखीन बरेच काळ शेजाऱ्याच्या घरामध्ये राहावे लागणार आहे.

Ganesh Chaturthi 2021: गणरायासाठी पूरग्रस्तांचीही लगबग
Goa Ganesh Festival: वैशिष्ट्यपूर्ण गोमंतकीय 'चवथ'

सरकारची मदत जाहीर झाली. त्यात आपल्या कुटुंबांचे नावही होते. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे बॅंकेत पैसे आले नव्हते. जोरदार पाऊस लागत असल्याने व मतदही मिळाली नसल्याने घराचे बांधकाम सुरू करणे शक्य झालेले नाही. मात्र, चवथ बंद ठेवून चालणार नाही. म्हणून घराच्या जागेतच प्लास्टिक मंडप घालण्याचे ठरवले.

सुरेश केसर गावडे, कणकीरे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com