
तुम्हाला गाजराचा हलवा आवडतो का? बदाम घातलेला गोड गोड गाजर हलवा जर का तुम्हाला आवडत असेल मात्र गाजर किसण्याच्या त्रासामुळे हलवा करण्यापासून मागे फिरत असाल तर आज आम्ही यावर तुम्हाला कायमचा उपाय सुचवणार आहोत. गाजर किसण्यामध्ये भरपूर वेळ वाया जातो आणि मग एवढे कष्ट का करावेत म्हणून आपण मागे फिरतो पण आता असं करावं लागणार नाही आम्ही तुम्हाला यावर एक कायमचा आणि जबरदस्त उपाय सुचवू, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचाच..
तुमच्या आवश्यकतेनुसार आधी गाजर धुवून घ्या आणि त्यानंतर गाजराची साल काढा, यानंतर गाजराचे तुकडे करून काहीवेळ उकडत ठेवा.
आता तुम्हाला एका पेनमध्ये गाजर आणि दूध एकजीव करून घ्यायचं आहे. लक्ष्यात ठेवा तुम्हाला गाजर दुधामध्ये शिजवायचा आहे आणि गाजर मस्त शिजल्यानंतर ते मैश करून घ्या. अशाप्रकारे जर का तुम्ही गाजराचा हलवा केलात तर वेळ खाऊ प्रकरणात कंटाळा येणार नाही.
यानंतर तुम्हाला गजराचा हलवा थोडा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावा लागेल आणि त्यानंतर तुम्ही नेहमीप्रमाणे साखर, तूप मिक्स करू शकता. गाजराचा हलवा आणखीन रुचकर बनवण्यासाठी त्यात सुका मेवा टाकणं कधीही चांगलं. यामुळे गाजराच्या हलव्याची चव वाढते आणि जास्ती वेळ न दवडता घरच्यांसोबत हलव्याचा गोडवा चाखता येतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.