Monsoon Food Safety Tips: पावसाळा सुरू झाला असून आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण पावसाळा अनेक आजार घेऊन येतो. निरोगी राहण्यासाठी पोषक पदार्थांचे सेवन करावे.पण पावसाळ्यात पदार्थ लवकर खराब होतात. यामुळे पदार्थ खराब होऊ नये म्हणून काय करावे हे जाणून घेऊया.
पावसाळ्यात ओलसरपणा जास्त असतो, त्यामुळे जेवणाची खरी चवही बिघडते. इतकेच नाही तर बॅक्टेरिया आणि बुरशीमुळे खाल्ल्याने आपण आजारी पडू शकतो. या पावसाळ्यात अन्न पदार्थ खराब होण्यापासून बचाव करण्यासाठी पुढिल टिप्स फॉलो कार.
काचेचे भांडे वापरा
पावसाळ्यात फराळाचे पदार्थ आणि इतर गोष्टी जास्त वेळ पॅकेटमध्ये ठेवल्यास खराब होऊ शकते. ओलसरपणामुळे पॅकेट लवकर खराब होतात. या गोष्टी जतन करण्यासाठी काचेच्या भांड्याचा वापर करा. अशा वस्तू फक्त एअर टाईट डब्ब्याममध्ये ठेवावे. ज्यामुळे त्यांची शेल्फ लाइफ देखील वाढेल. याशिवाय, तुम्ही झिप लॉक बॅग देखील वापरू शकता.
ओलसर ठिकाणी पदार्थ ठेऊ नका
बर्याच वेळा आपण अन्नपदार्थ अशा ठिकाणी ठेवतो, जिथे आधीच ओलावा किंवा ओलसरपणा असतो. ही अशी जागा आहे जिथे बहुतेक जीवाणू वाढतात. त्यामुळे अन्न साठवण्याआधी अशी ठिकाणे ओळखा किंवा कोणताही खाद्यपदार्थ व्यवस्थित सुकल्यानंतरच ठेवावे.
खरेदी करतांना काळजी घ्यावी
पावसाळ्यात ताज्या फळे आणि भाज्यांना प्राधान्य दिले पाहिजे. तसेच, भाज्या ताजे ठेवणाऱ्या पुरवठादारांकडूनच खरेदी करावे.घरी भाज्या आणल्यावर स्वच्छ धुवावे आणि फ्रिजमद्ये ठेवावे.
दुग्धजन्य पदार्थांची काळजी घ्यावी
फ्रिजमध्ये दुग्धजन्य पदार्थ ठेवण्यासाठी, त्याचे तापमान 0 ते 5 अंशांवर सेट करावे. यामुळे जिवाणूंची वाढ होणार नाही आणि ते दीर्घकाळ ताजे राहतील.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.