Hair Loss Prevention: अकाली टक्कल पडण्यापासून असे वाचवा स्वत:ला

Food For Hair Care: वाढते प्रदूषण आणि अयोग्य आहारामुळे आपले केस कमकुवत होऊन तुटायला लागतात.
Food For Hair Loss Prevention
Food For Hair Loss PreventionDainik Gomantak
Published on
Updated on

Food For Hair Loss Prevention: बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. हार्ट अॅटॅक, मधुमेह यांसारख्या आजारांबरोबरच केस, त्वचा यांच्यावरदेखील मोठा परिणाम झाल्याचे दिसून येते.

आजकाल लहानापासून मोठ्यापर्यंत अनेकांना केसांबाबतच्या अनेक समस्या दिसून येतात. त्यामध्ये केस गळणे, टक्कल पडणे, केस तुटणे आणि अकाली केसांचे पांढरे होणे या समस्या सर्व वयोगटातील महिला आणि पुरुषांमध्ये दिसून येतात.

अकाली टक्कल होण्याच्या समस्येमुळे आपल्यापैकी अनेकजण त्रस्त होताना दिसत आहेत. अगदी लहान मुलांनादेखील या समस्येला सामोरे जावे लागते.

वाढते प्रदूषण आणि अयोग्य आहारामुळे आपले केस कमकुवत होऊन तुटायला लागतात. यासाठी अनेकजण आपापल्या परीने उपाययोजना करत असतात.

आपल्या आहारात थोडा बदल केला तर आपण केस गळण्यापासून रोखू शकतो. चला तर जाणून घेऊयात आपल्या केसांच्या आरोग्यासाठी कोणते पदार्थ उपयुक्त ठरतील.

1. अंडी

केस मुळापासून मजबूत करायचे असतील तर अंडी खा. केस प्रथिनांनी बनलेले असतात आणि प्रथिनांच्या कमतरतेमुळे केसांची वाढ थांबू शकते. अंडी हा प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. शरीरातील प्रथिनांची कमतरता भरून काढून केस मजबूत करण्यास अंडी मदत करते.

अंड्यांमधून आपल्याला केवळ प्रथिनेच मिळत नाहीत तर केसांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असलेल्या झिंक, सेलेनियम, जीवनसत्त्वे ए, डी आणि बी12 देखील मिळतात. त्यामुळे तुम्ही रोज 1 अंडे खाल्ले तर तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

Food For Hair Loss Prevention
Daily Horoscope 25 August: जीवनात प्रेम नवे वळण घेण्याची शक्यता! वाचा आजचे पूर्ण राशीभविष्य

2. शेंगदाणे

शेंगदाणे आवश्यक मानले जातात. शेंगदाण्यात बटरमध्ये प्रथिने तसेच व्हिटॅमिन ई आणि बायोटिनचे प्रमाणही चांगले असते, जे केसांचे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते.

त्यामुळे जर तुम्ही केस गळण्याची समस्या असेल तर तुम्ही तुमच्या आहारात शेंगदाण्याचा किंवा त्यापासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे.

3. पालक

जर तुम्हाला लांब केस हवे असतील तर पालक खा. पालकमध्ये लोह, फोलेट आणि अनेक प्रकारची विशेष जीवनसत्त्वे आढळतात, जे केसांचे आरोग्य राखण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात.

4. ड्रायफ्रुट्स

बहुतेक सर्व ड्रायफ्रुट्समध्ये अनेक प्रकारचे फॅटी अॅसिड, झिंक आणि व्हिटॅमिन ई आणि बी चे प्रमाण जास्त असते. ज्याचे सेवन केल्याने केसांना पूर्ण पोषण मिळते आणि अनेक समस्या दूर होतात. म्हणूनच तुम्ही तुमच्या आहारात सुक्या मेव्यांचा समावेश केला पाहिजे.

5. लिंबूवर्गीय फळे

संत्री आणि लिंबू यांसारख्या पदार्थांमध्ये भरपूर फायदेशीर अँटिऑक्सिडंट असतात. व्हिटॅमिन सी केसांच्या वाढीस चालना देण्यास मदत करतात. केसगळतीचा त्रास असलेल्यांनी त्यांच्या आहारात लिंबूवर्गीय फळांचा समावेश करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com