Katrina Kaif Workout Routine: कतरिना कैफची स्लिम फिगर सर्वांनाच आकर्षित करते. आपल्या आवडत्या अभिनेत्रीप्रमाणे फिट दिसणे हे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री कतरिना कैफ ही ब्युटी क्वीन आहे.
मेकअपशिवायही ती खूप सुंदर दिसते. तिच्या फिटनेसचे लाखो चाहते आहेत. तिला फॉलो करणाऱ्या लाखो मुलींना तिच्यासारखीच फिगर आणि फिटनेस हवा आहे. पण ते इतके सोपे नाही. कारण कतरिना स्वतःला फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत करते. तिच्यासारखी फिगर मिळविण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते जाणून घ्या
1. कतरिना स्वत:ला हेल्दी आणि फिट ठेवण्यासाठी ती वर्कआउट करते आणि हेल्दी डाएटही फॉलो करते. सायकलिंग आणि योगा हा तिच्या दिनचर्येचा भाग आहे.
2. बॉलिवूड ब्युटी क्वीन कतरिना कैफ जॉगिंग कधीच चुकवत नाही. तिच्या शरीराचा स्टॅमिना वाढवण्यासाठी ती जॉगिंगची मदत घेते. ती तिच्या ट्रेनरने दिलेल्या वर्कआउट टिप्स फॉलो करते.
3. कतरिना तिच्या फिटनेसबाबत खूप गंभीर आहे. फिट आणि स्लिम फिगर मिळविण्यासाठी, ती पॉवर प्लेट, कार्डिओ, केटलबेल सारखे अनेक व्यायाम वेळोवेळी करते. Pilates सोबत ती रोज फंक्शनल ट्रेनिंग देखील घेते.
4. कतरिना तिची फिगर कायम ठेवण्यासाठी काटेकोर डाएट फॉलो करते. यात ती कसलाही निष्काळजीपणा करत नाही. सकाळी उठल्याबरोबर ती सर्वप्रथम ४ ग्लास पाणी पिते आणि नंतर ताज्या आणि उकडलेल्या भाज्यांसोबत दर दोन तासांनी एक फळही घेते.
5. कतरिना कैफच्या नाश्त्यामध्ये डाळिंबाचा रस, उकडलेल्या अंड्याचा पांढरा भाग, दलिया यांचा समावेश होतो. दुपारच्या जेवणात ती फक्त डाळी, भात, हिरवी कोशिंबीर आणि ताज्या भाज्या खाते. रात्रीच्या जेवणात तिला उकडलेल्या भाज्या, रोटी आणि हिरवी कोशिंबीर सूपसोबत खायला आवडते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.