घरातून बाहेर पडतांना किंवा समारंभात जातांना परफ्यूम किंवा डिओ लावतो. परफ्यूम (Perfume) लावल्याने आपल्याला फ्रेश वाटते. परफ्यूमचा सुगंध दीर्घकाळ टिकून राहावा अशी इच्छा असते. पण अनेक लोक परफ्यूम (Perfume) शरीरापेक्षा कपड्यांवर अधिक लावतात. पण परफ्यूम खरेदी करतांना काळजी घेणे गरजेचे आहे. बाजारात (Market) अनेक प्रकारचे परफ्यूम असतात. यामुळे आपण गोंधळून जातो. तुम्ही जर प्रथमच परफ्यूम (Perfume) खरेदी करत असाल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
* परफ्यूमची माहिती असावी
बाजारात अनेक ब्रॅंडचे परफ्यूम (Perfume) उपलब्ध असतात. त्यामुळे कोणताही परफ्यूम खरेदी करण्यापूर्वी त्याबद्दल माहिती करून घ्यावी. तुमच्या आवडीनुसार परफ्यूम खरेदी करावा. प्रत्येक परफ्यूमचे वेगेवगेले वै असते. यामुळे त्या परफ्यूमबद्दल इंटेरनेटवर माहिती पाहावी.
* सैंपल वापरुन पहा
परफ्यूम (Perfume) खरेदी करण्यापूर्वी मनगटावर लावून तपासावा. काही परफ्यूम वापरुन पाहावे. नंतरच परफ्यूम खरेदी करावा.
* त्वचेच्या प्रकारानुसार खरेदी करा
परफ्यूम (Perfume) खरेदी करतांना आपल्या त्वचेचा विचार करावा. जर तुमची त्वचा सेंसिटिव असेल तर स्ट्रॉंग परफ्यूम (Strong Perfume) वापरू नका. अन्यथा तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. प्रत्येकाने आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार परफ्यूम खरेदी करावा.
* परफ्यूम लावण्याचा योग्य मार्ग
परफ्यूम (Perfume) अधिक काळ टिकण्यासाठी मनगटला लवण्याएवजी अंडरआर्म्सवर आणि कानाच्या मागे लावावे. कारण या भागात तापमान अधिक असल्याने परफ्यूम (Perfume) अधिक काळ टिकतो. जर तुम्ही कपड्यावर (Cloths) परफ्यूम लावला तर तो अधिक काळ टिकून राहत नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.