First Meeting Tips: पहिल्याच भेटीत समोरच्या व्यक्तीला इम्प्रेस करण्यासाठी वापरा या भन्नाट ट्रीक्स

तुमच्या पहिल्या भेटीत समोरच्या व्यक्तीला कम्फर्टेबल वाटण्यासाठी काही ट्रिक्सचा वापर करू शकता.
Relationship Tips
Relationship TipsDainik Gomantak
Published on
Updated on

First Meeting Tips: जेव्हा तुम्ही पहिल्यादांच एखाद्या व्यक्तीला भटायला जाता तेव्हा खुप गोंधळलेले असता. अशा वेळी छोट्या छोट्या चुका होतात. यामुळे नकळतपणे समोरच्या व्यक्तीवर बॅड इम्प्रेशन पडते. तुमच्या पहिल्या भेटीत समोरच्या व्यक्तीला कम्फर्टेबल वाटण्यासाठी काही ट्रिक्सचा वापर करू शकता.

  • हसत-खेळत संवाद साधावा

पहिल्या भेटीत संवाद साधतांना तुम्ही हसत-खेळत संवाद साधला पाहिजे. संवादा दरम्यान जोक्स सांगावे. यामुळे समोरच्या व्यक्तीचे टेन्शन कमी होईल. तसेच जवळकी वाढू शकते.

  • गिफ्ट देऊ शकता

एखाद्या व्यक्तीला गिफ्ट दिल्यास खुप आनंद होतो. तुम्ही पहिल्या भेटीत महागडी नाही पण स्वस्त असे गिफ्ट देऊ शकता. यामध्ये तुम्ही फुल, चॉकलेट यासारख्या वस्तु गिफ्ट म्हणून देऊ शकता.

Relationship Tips
Chandrayaan 3 च्या सन्मानार्थ लाँच केली इलेक्ट्रिक बाइक; जाणून घ्या जबरदस्त फिचर
Dainik Gomantak
  • पुढाकार घेऊन बोलण्यास सुरूवात करावी

अनेकदा लोक पहिल्या भेटीत बोलताना संकोच करतात. यामुळे तुम्ही स्वत:हून एखाद्या विषयावर बोलण्यास सुरूवात करावी. यामुळे दोघांमध्ये संवाद साधायला सुरूवात होईल.

  • एखादी मजेसीर किस्सा सांगावा

तुम्हाला जर बोलण्यासारखे काही नसे तर तुम्ही त्यांना मजेदार किस्सा सांगू शकता. यामुळे समोरच्या व्यक्तीला बोलण्यात इंट्रेस्ट वाढेल.

  • समोरच्या व्यक्तीचेही ऐकावे

समोरच्या व्यक्तीलाही बोलण्याची संधी द्यावी. त्यांना काही बोलायचे आहे का असे विचारावे. त्याच्याबद्द्ल जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. यामुळे त्या व्यक्तीला तुमच्यासोबत बोलताना कम्फर्टेबल वाटेल.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com