Feng Shui Plants : 'ही' 4 फेंगशुई रोपं घरात आणतात सुख-समृद्धी

Feng Shui Plants : फेंगशुईनुसार, घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा व्यक्तीच्या आयुष्यावर नक्कीच परिणाम होतो.
Feng Shui Plants
Feng Shui PlantsDainik Gomantak
Published on
Updated on

Feng Shui Plants : फेंगशुईनुसार, घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा व्यक्तीच्या आयुष्यावर नक्कीच परिणाम होतो. फेंगशुईमध्ये सांगितलेल्या काही गोष्टी घरात सकारात्मक ऊर्जा आणतात. वास्तुशास्त्राप्रमाणे फेंगशुईमध्ये झाडे आणि वनस्पतींना विशेष महत्त्व आहे.

यानुसार काही झाडे घराची ऊर्जा सकारात्मक करतात. त्यांचा प्रभाव घरातील सदस्यांवर पडतो. फेंगशुईनुसार, ही झाडे घरात लावल्याने घरात सुख-समृद्धी येते. जाणून घेऊया या खास 4 झाडांबद्दल.

(Feng Shui Plants)

स्नेक प्लॅंट

हे एक इनडोअर प्लांट आहे. हे घर किंवा कार्यालयात आपण लाऊ शकतो. हे लावल्याने घराचे सौंदर्य वाढते तसेच घरात सकारात्मक ऊर्जाही येते. घरामध्ये रोप लावल्याने आर्थिक स्थिती सुधारते. या वनस्पतीमुळे मानसिक ताण कमी होतो आणि आराम मिळतो.

बांबू प्लॅंट

ही वनस्पती पर्यावरण स्वच्छ ठेवते. फेंगशुईनुसार, बांबूचे रोप घरात ठेवल्याने भाग्य खुलते. या वनस्पतीमुळे घरात सुख-समृद्धी येते. हे लावल्याने घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. या वनस्पतीमुळे व्यवसायातही फायदा होतो. बांबूच्या रोपाला लाल धाग्याने बांधल्याने संपत्ती वाढण्याची शक्यता वाढते.

मनी प्लॅंट

फेंगशुईनुसार घरामध्ये मनी प्लांट लावल्याने घरात सुख, समृद्धी आणि धनाचे आगमन वाढते. असे मानले जाते की ही वनस्पती जितकी जास्त पसरेल तितका जास्त आर्थिक फायदा होईल. मनी प्लांट नेहमी आग्नेय दिशेला ठेवावा. या वनस्पतीतून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

जेड प्लॅंट

जेड वनस्पतीला क्रॅसुला देखील म्हणतात. फेंगशुईमध्ये, हे समृद्धी, यश आणि नशीबाचे प्रतीक मानले जाते. ते लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. ही वनस्पती घरातील सदस्यांचे सौभाग्य वाढवण्याचे काम करते. हे घर आणि ऑफिसमध्ये लावल्याने कार्यक्षमता वाढते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com