Personality Based on Colours: प्रत्येक रंगाला एक खास महत्त्व आहे. प्रत्येकाच्या आवडीचा एक रंग हा वेगवेगळा असतो. आपल्या आवडीचा रंग पाहिल्यावर आपला मूड चांगला होतो.
कारण त्या रंग आणि तुमच्या स्वभावामध्ये काहीतरी संबध असतो. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या आवडत्या रंगातून तुमच्या व्यक्तिमत्त्वबद्दल अधिक माहिती.
काळा रंग
ज्या लोकांचा आवडता रंग काळा असतो ते स्वतंत्र, बलवान आणि निर्भय असतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात नेतृत्वगुण आहे. त्यांना यश मिळवायला खूप आवडते.
निळा रंग
निळा रंग हे भव्यतेचं प्रतिक आहे. ज्या लोकांना निळा रंग आवडतो त्यांचा स्वभाव खूप शांत असतो. डोळे बंद करून तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकता. ते निष्ठावान असतात. हे लोक इतरांची गुपिते स्वतःपासून लपवून ठेवण्यात माहीर असतात. त्यांना मित्र आणि कुटुंबासोबत राहायला आवडते.
लाल रंग
हा रंग प्रेम आणि धैर्याचा रंग आहे. असे लोक खूप धाडसी असतात आणि जोखीम घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत. या लोकांना प्रवास करायला आणि लोकांमध्ये राहायला आवडते. ते बिनधास्तपणे त्यांचे शब्द आणि भावना व्यक्त करतात.
पांढरा रंग
हा रंग शांततेचे प्रतीक मानला जातो. या लोकांकडे निर्णय शक्ती अधिक आहे. कोणताही निर्णय घेण्याची क्षमता खूप मजबूत असते. त्यांना समाजात खूप मान मिळतो. ज्या लोकांना पांढरा रंग आवडतो अशी माणसं कोणाच्या जीवनात कधीच ढवळाढवळ करीत नाहीत.पांढरा रंग आवडणाऱ्या व्यक्ती शांत आणि समजूतदार स्वभावाच्या असतात.
हिरवा रंग
हिरवा रंग नवनिर्मितीचे प्रतिक मानले जाते. निसर्गात हिरव्या रंगाची उधळण सतत सुरू असते. हिरवा रंग आवडणारी व्यक्ती आनंदी स्वभावाची असते. हिरवा रंग मन आणि डोळ्यांना थंडावा देतो. म्हणूनच जेव्हा तुम्हाला थकल्यासारखं आणि निराश वाटू लागेल तेव्हा हिरव्या रंगाचे कपडे वापरा. ज्यामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक समाधान मिळेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.