FasTag चे KYC अपडेट करण्यासाठी जाणून घ्या पद्धत

हा निर्णय घेण्यात आला आहे कारण अलीकडच्या काळात असे अनेक अहवाल आले की ज्यात एका वाहनासाठी अनेक फास्टॅग केवायसी शिवाय जारी केले गेले आहेत
FasTag
FasTag Dainik Gomantak
Published on
Updated on

FasTag Updates: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)ने सांगितले की अपूर्ण केवायसी असलेले फास्टॅग 31 जानेवारीनंतर निष्क्रिय केले जातील किंवा बँका त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकतील. हा निर्णय घेण्यात आला आहे कारण अलीकडच्या काळात असे अनेक अहवाल आले की ज्यात एका वाहनासाठी अनेक फास्टॅग केवायसी शिवाय जारी केले गेले आहेत

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणची ही सूचना 'एक वाहन, एक फास्टॅग' धोरणांतर्गत जारी करण्यात आली आहे. ज्याचा उद्देश अनेक वाहनांसाठी एक फास्टॅग आणि एका वाहनावर अनेक फास्टॅगचा वापर रोखणे आहे. प्राधिकरणाने सांगितले की हे पाऊल उचलण्यामागे त्याची इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली मजबूत करणे आणि टोल प्लाझावरील लोकांना अधिक चांगला अनुभव प्रदान करणे हा देखील आहे.

या संदर्भात NHAIने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की गैरसोय टाळण्यासाठी, वापरकर्त्यांनी त्यांच्या नवीनतम फास्टॅगचे केवायसी पूर्ण असल्याची खात्री करावी.

फक्त नवीन फास्टॅग खाती सक्रिय राहतील. कोणत्याही प्रकारची मदत किंवा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी, फास्टॅग वापरकर्ते त्यांच्या जवळच्या टोल प्लाझावर जाऊ शकतात किंवा टोल फ्री नंबरवर फास्टॅग जारी करणार्‍या बँकेच्या ग्राहक सेवा अधिकाऱ्याशी संपर्क साधू शकतात.

कसे अपडेट करावे

1. सर्वातपहिले इंडियन हायवे मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या फास्टॅग पोर्टलवर जावे.

2. तुमच्या खात्याशी संबंधित फोन नंबर आणि पासवर्ड वापरून लॉग इन करावे.

3. नंतर डॅशबोर्डवरील My Profile वर क्लिक करा आणि तुमची KYC स्टेटस चेक करावे.

4. यानंतर KYC पर्यायावर क्लिक करा आणि अपडेटसाठी ग्राहक प्रकार सिलेक्ट करावे.

5. आवश्यक माहिती भरा आणि आयडी आणि पत्त्याच्या पुराव्याची प्रत सबमिट करावे.

6. तुमच्या KYC वर प्रक्रिया केली जाईल आणि सात दिवसात अपडेट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com