Skin Care Tips: वृद्धत्वामुळे त्वचेचा रंग आणि चमक कमी होते. यासाठी अनेक स्किन केअर रुटीन ट्रेंडमध्ये आहेत. ज्यामुळे चेहऱ्यावरील रेषा आणि सुरकुत्या दूर केल्या जाऊ शकतात. या स्किनकेअर घटकांपैकी एक म्हणजे रेटिनॉल. यामध्ये व्हिटॅमिन ए यामध्ये आढळते, जे बारीक रेषा आणि सुरकुत्या दूर करण्यासाठी फायदेशीर असते. मुरुमांवर उपचार असो किंवा सूर्यकिरणांमुळे होणारे नुकसान असो, रेटिनॉल तुम्हाला अनेक समस्यांपासून दूर ठेऊ शकते. मात्र, त्याच्या गैरवापरामुळे त्वचेला काही धोकाही निर्माण होतो. यामुळे ते वापरताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
अतिवापर करणे
जर तुम्ही याचा स्किनकेअर रूटिनमध्ये समावेश करण्याचा विचार करत असाल तर सुरुवातीला ते कमी प्रमाणात लावावे. त्वचेवर चाचणी करण्यासाठी, 0.1% ते 0.2% च्या कॉन्सेंट्रेशनने सुरूवात करा. तुमच्या त्वचेवर ते कसे रिअॅक्ट करत आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आठवड्यातून दोनदा याचा वापर करू शकता. लक्षात ठेवा, जर तुम्ही संवेदनशील त्वचेच्या श्रेणीतून येत असाल तर ते वापरण्यापूर्वी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सनस्क्रीन लावणे
जर तुम्ही स्किनकेअरम रूटिनमध्ये रेटिनॉल वापरत असाल तर दररोज सनस्क्रीन लावावे. ते तुमची त्वचा सूर्यासाठी अधिक संवेदनशील बनवू शकत असल्याने, किमान 30 च्या SPF सह ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावावे. हे तुमच्या चेहऱ्याला सूर्याच्या अतिनील किरणांमुळे होणारे नुकसान टाळेल.
पॅच टेस्ट करावी
रेटिनॉलचा प्रभाव जोरदार आहे. हे प्रत्येकाच्या त्वचेला सुट होत नाही. म्हणून ते वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या मानेवर किंवा कानाच्या खाली रेटिनॉल आधारित सीरम किंवा क्रीम लावु शकता. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या त्वचेवर होणारे दुष्परिणाम जाणून घेऊ शकाल. जर तुम्हाला लालसरपणा किंवा खाज सुटत असेल तर ते तुमच्या चेहऱ्यावर अजिबात वापरू नका.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.