फॅमिली प्लॅनिंगचा विचार करताय? मग रोज सकाळी खा 'हे' पदार्थ

गर्भधारणेसाठी महिलांनी त्यांच्या आहारात काही आरोग्यदायी बदल करणे गरजेचे असते.
Family Planning
Family PlanningDainik Gomantak
Published on
Updated on

Family Planning: आई होणे ही प्रत्येक महिलेच्या जीवनातील एक सुखद अनुभव असतो. आजकाल अनेक कारणांमुळे महिला उशिरा आई बनत आहेत. त्यामुळे गर्भधारणा होणे कठीण होऊ शकते. गर्भधारणेची योजना करण्यापूर्वी कोणत्याही महिलेला तिच्या आहारात आणि लाइफस्टाइलमध्ये बदल करणे गरजेचे आहे. पौष्टिकतेने समृद्ध आहार आणि निरोगी लाइफस्टाइल तुमच्या गर्भधारणेची शक्यता वाढवू शकते. ज्या महिला गर्भधारणेची योजना आखत आहेत त्यांनी पुढील गोष्टींचा आहारात समावेश करावा.

  • भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बिया झिंकचा चांगला स्रोत आहे. हे थायरॉईड नियंत्रणात ठेवम्यास मदत करते. तसेच ते प्रजननासाठी आवश्यक हार्मोन्स संतुलित करते. दररोज 1 चमचे भोपळ्याच्या बियांचे सेवन करावे.

  • सूर्यफूल बिया

सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. हे शुक्राणूंची संख्या वाढवण्यास मदत करते. सूर्यफुलाच्या बियांमध्ये झिंक, फॉलिक अॅसिड आणि सेलेनियम हे घटक आढळतात. यामुळे महिलांची प्रजनन क्षमता सुधारते. दररोज सकाळी 1 चमचा सूर्यफुलाच्या बियांचे सेवन करावे.

  • बदाम

बदामामध्ये व्हिटॅमिन ई असते. हे महिलांची प्रजनन क्षमता वाढवण्यास मदत करते. यामध्ये आढळणारे हेल्दी फॅट्स महिलांच्या आरोग्यासाठी आणि हार्मोनल संतुलनासाठी चांगले असतात. सकाळी 5-7 भिजवलेले बदाम खाणे आरोग्यासाठी चांगले असते. .

  • पिस्ता

पिस्त्यामध्ये प्रथिने, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. यामध्ये आढळणारे पोषक घटक अंडाशयाचे आरोग्य आणि गुणवत्तेसाठी चांगले असतात. तसेच गर्भधारणेची शक्यता वाढवते. यामुळे पुरूष आणि महिलांनी मूठभर पिस्ता खाणे फायदेशीर आहे.

  • अक्रोड

अक्रोड खाणे महिला आणि पुरुषांच्या प्रजनन क्षमतेसाठी चांगले मानले जाते. त्यात असलेले ओमेगा 3 फॅटी अॅसिड शुक्राणूंसाठी चांगले मानले जाते. अक्रोड नेहमी भिजवून खावे. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. दिवसातून 3-5 अक्रोड खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com