बदलत्या वातावरणात लोकांच्या त्वचेत खूप बदल होतात. अनेकांना कोंडयाचा त्रास होतो. जवळजवळ प्रत्येकाला कोंडयाचा सामना करावा लागतो. ही समस्या कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता.
बदलत्या वातावरणामुळे केसांमध्ये तसेच भुवया आणि पापण्यांवरही कोंडा जमा होऊ लागतो. यासाठी योग्य काळजी घेणे गरजेचे असते. जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर त्याचा परिणाम तुमच्या भुवया आणि पापण्यांवर दिसू लागतो. बदलत्या हवामानात याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
जर तुम्ही योग्यवेळी काळजी घेतली नाही तर ती समस्या वाढू शकते. त्यातून सुटका करणे सोपे नाही. घरगुती उपाय करून देखील कोंड्याची समस्या कमी करू शकता.
अशी घ्या काळजी
जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर कोंडा कमी करायचा असेल तर चेहऱ्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी वेळोवेळी चेहरा स्वच्छ धुत राहावा. यासोबतच चेहऱ्यावर चांगल्या दर्जाची क्रीम लावावे. आठवड्यातून एकदा तरी भुवयांवर कोरफड वेरा जेल लावावा.
ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑइलमध्ये अनेक घटक असतात. यामुळे चेहऱ्यावरचे ब्लॅकहेड्स कमी होण्यास मदत मिळते. तसेच आयब्रो ब्रश वापरुन, ऑलिव्ह ऑइल डोळ्यांच्या पापण्या आणि भुवयांवर नीट लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. या मसाजनंतर 5 मिनिटांनी स्वच्छ सुती कापड कोमट पाण्यात भिजवून स्वच्छ पुसून घ्यावे.
कोमट पाणी
जर तुमच्या भुवयांवर कोंडा जमा झाला असेल तर ते काढण्याची घाई करू नका. यासाठी एका भांड्यात कोमट पाणी घ्या. नंतर या पाण्यात एक सुती कापड भिजवा आणि कोंडा असलेल्या भागाला हलक्या हाताने पुसावे. आपण दिवसातून दोन ते तीन वेळा असे केल्यास कोंडा कमी होऊ शकतो.
टी ट्री ऑइल
तुम्ही भुवयावरचा कोंडा कमी करण्यासाठी टी ट्री ऑइल वापरू शकता. यासाठी सर्वात पहिले टी ट्री ऑइल गरम करून एका भांड्यात काढावे. यानंतर, इअरबड्सच्या मदतीने ते भुवयांवर लावावे. काही दिवसात कोंडा कमी होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.