Korean Eye Mask: आजकाल भारतात कोरियन ड्रामा पाहण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यासोबतच कोरियन स्किन केअरबद्दल मुलींमध्ये जागरुकताही वाढत आहे.
कोरियन महिलांच्या सौंदर्य निगा राखण्याच्या लाइफस्टाइलबद्दल जाणून घेण्याची आणि आपल्या त्वचेच्या काळजीमध्ये ती समाविष्ट करण्याची आपल्यामध्ये क्रेझ वाढत आहे.
कारण आपली त्वचा कोरियन महिलांसारखी निष्कलंक आणि चमकदार व्हावी अशी आपल्या सर्वांना इच्छा आहे. डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी कोरियन आय केअर प्रोडक्ट्समध्ये जे घटक तुम्हाला बाजारात उपलब्ध आहेत, ते तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातही मिळतील आणि त्यांच्या मदतीने तुम्ही डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करू शकता.
रोज वॉटर आय मास्क
साहित्य
1 टीस्पून- गुलाबजल
5 थेंब - लिंबाचा रस
पद्धत
गुलाबजल आणि लिंबाचा रस मिसळा आणि त्यात ड्राय अंडर आय मास्क बुडवून काही वेळ डोळ्यांखाली लावा. आता तुम्ही 10 मिनिटांनंतर ते काढू शकता. या आय मास्कचा नियमित वापर केल्यास डोळ्यांभोवतीचा काळपटपणा कमी होईल.
फायदा
गुलाब पाण्यामध्ये त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करण्याची आणि स्वच्छ करण्याची क्षमता असते. लिंबूमध्ये ब्लीचिंग गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचेचा रंग सुधारतो. डोळ्यांखालील मास्क खूप प्रभावी ठरू शकतो.
हनी आय मास्क
मधामध्ये त्वचेला मॉइश्चरायझिंग आणि ब्लीचिंग करण्याचे गुणधर्म असतात. तुम्ही कोणत्याही मिश्रणाशिवाय थेट डोळ्याभोवती मध लावू शकता. दिवसातून दोनदा डोळ्यांभोवती नियमितपणे मध लावल्यास त्याचे बरेच फायदे मिळू शकतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मधात चिमूटभर हळदही मिक्स करू शकता.
टी ट्री ऑइल आय मास्क
साहित्य
1 टीस्पून - कोरफड जेल
2 थेंब- टी ट्री ऑइल
पद्धत
कोरफड जेलमध्ये टी ट्री ऑइल मिसळा आणि हे मिश्रण डोळ्याभोवती लावा. 10 मिनिटांनंतर आपले डोळे पाण्याने धुवा. रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांखाली हा मास्क लावावा. तुम्ही रात्रभर डोळा मास्क म्हणून देखील वापरू शकता.
फायदा
कोरफड जेलमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे डोळ्यांभोवतीचा काळपटपणा कमी होतो. तर टी ट्री ऑइल खराब झालेल्या त्वचेला दुरुस्त करण्याचे काम करते.
ग्रीन-टी आय मास्क
साहित्य
1 टीस्पून - ग्रीन- टी वॉटर
1 टीस्पून -बटाट्याचा किस
पद्धत
बटाटे किसून घ्या आणि ग्रीन टी गरम पाण्यात उकळा. त्यानंतर हे दोन्ही मिश्रण एकत्र करून डोळ्याभोवती आयपॅकप्रमाणे लावा. जर तुम्ही हे काम रोज केले तर तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होईल.
फायदा
बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे त्वचा ब्लीच होते. तर ग्रीन टीचे पाणी त्वचेवर ग्लो आणते. अशाप्रकारे हा एक परिपूर्ण घरगुती आय पॅक बनू शकतो.
तांदळाच्या पाण्याचा आय मास्क
तांदळामध्ये फक्त त्वचा घट्ट करण्याचा गुणधर्म नसून तुम्ही त्वचेवर चमक आणण्यासाठी आणि मृत त्वचा काढून टाकण्यासाठी देखील याचा वापर करू शकता. कधीकधी डोळ्यांभोवती मृत त्वचा जमा झाल्यामुळे काळपटपणा जाणवतो. जो तुम्ही तांदळाच्या पाण्याने कमी करू शकता. यासाठी तुम्हाला रात्रभर तांदूळ पाण्यात भिजवावे लागतील आणि त्यानंतर तुम्ही या पाण्यात कोरडे आयपॅड्स बुडवून 10 मिनिटे डोळ्यांवर ठेऊ शकता.
(टिप: वरील उपाय करण्यापुर्वी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.