आजकालच्या धावपळीच्या जगात आपण आपल्या डोळ्यांच्या आरोग्याकडे (Eye) दुर्लक्ष करतो. बदलती जीवनशैली, खाण्याच्या अवेळी, मोबाइल (Mobile), टीव्ही (tv) आणि लॅपटॉपचा (Laptop) अतिवापरामुळे डोळ्यांचे दुखणे आता सामान्य आहे. अधिक वेळ स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो. यामुळे दृष्टी कमकुवत होऊ लागते. डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी आपल्याला चष्मा घालण्याशिवाय दूसरा पर्याय नसतो. तसेच आजकालचे लहान मुले (Small children) बाहेर खेळण्यापेक्षा मोबाइल (Mobile) आणि व्हीडीओ गेम्स (Video games) खेळण्यात अधिक वेळ घालवतात, यामुळे कमी वयातच मुलांची दृष्टी कमी होते. डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सकस आहाराची (Healthy Food) घेण्याची गरज असते. यात हिरव्या पालेभाज्या, फळे इतरबाबींचा समावेश करावा. शिवाय आहारात अनेक प्रकारमच्या ज्यूसचासुद्धा समावेश करावा. कारण ज्यूसमध्ये कॅरोटीनोईड्स आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. चला तर मग जाऊन घेवूया डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी कोणत्या ज्यूसचे सेवन करायला हवे.
* गाजरचा ज्यूस (Carrot juice)
गाजराचा ज्यूस पिल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. गाजरमध्ये व्हिटॅमिन 'ए' मुबलक प्रमाणात असतात. यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. गाजरचा ज्यूस पिल्याने चष्म्यापासून लवकर सुटका होऊ शकते. तुम्ही गाजरच्या ज्यूसमध्ये टोमॅटोचा ज्यूस देखील मिक्स करून घेऊ शकता.
* पालकाचा ज्यूस (Spinach juice)
हिरव्या पालेभाज्या दृष्टी वाढवण्यासाठी मदत करतात. हिरव्या पालेभाज्या डोळ्यांसाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. विशेष म्हणजे पालकाचा ज्यूस आरोग्यदायी आहे. कारण पालकमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि लोह भरपूर प्रमाणात असतात. तुम्ही जर नियमितपणे एक ग्लास पालकाचा ज्यूस पिल्यास तुमची दृष्टी सुधारण्यास मदत मिळते.
* आवळा ज्यूस (Amla juice)
आवळा आपल्या आरोग्यासाठी (Health) आणि डोळ्यासाठी (Eyes) लाभदयी आहे. यात व्हिटॅमिन 'सी' मुबलक प्रमाणात असते. यामुळे दृष्टी चांगली राहण्यास मदत मिळते. आवळ्याचा तुम्ही कोणत्याही प्रकारे सेवन करू शकता. तुम्ही कच्चा आवळा देखील खाऊ शकता. तसेच आवळ्यापासून जाम किंवा कँडी देखील तयार करू शकता. पण दृष्टी वाढवण्यासाठी आवळ्याचा ज्यूस खूप फायदेशीर आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.