Eye Brow: आयब्रोचा योग्य आकार वाढवेल चेहऱ्याचे सौंदर्य

Eye Brow: चेहऱ्याचे सौंदर्य हे आयब्रोमुळे अधिक वाढते. यामुळे आयब्रो करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.
Eye Brow
Eye BrowDainik Gomantak
Published on
Updated on

Eye Brow keep these things in mind while doing eyebrow shape

प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या आयब्रो शेप सुंदर दिसतात. काहींना जाड भुवया आवडतात, तर काहींना पातळ भुवया आवडतात. जर भुवया तुमच्या चेहऱ्यासाठी योग्य नसतील तर तो तुमचा लुक खराब करू शकतात. 

त्यामुळे भुवयांना योग्य आकार देणं खूप गरजेचं आहे. चेहऱ्याच्या आकारानुसार भुवयांचा आकार ठरवावा. तुम्हालाही तुमच्या आयब्रोला परफेक्ट शेप द्यायचा असेल तर ब्युटी पार्लरमध्ये जाण्यापूर्वी पुढील गोष्टी लक्षात ठेवा. 

लांब चेहऱ्यासाठी


जर तुमचा चेहरा लांब असेल तर सरळ आणि लांब भुवया तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असतील. हा आकार ऑप्टिकली तुमच्या चेहऱ्याची लांबी कमी करतो, ज्यामुळे तुमचा चेहरा अधिक संतुलित आणि आकर्षक दिसतो. 

चौकोनी चेहऱ्यांसाठी


चौकोनी चेहऱ्याच्या लोकांचे जबडे मजबूत असतात आणि कपाळ रुंद असते. अशा चेहऱ्यावर गोल किंवा कमानदार भुवया छान दिसतात. या भुवया चेहऱ्याची ताकद थोडी हलकी बनवून चेहरा मुलायम आणि आकर्षक बनवतात. गोलाकार भुवया चेहऱ्याचा लूक अधिक वाढवतात.

गोलाकार चेहऱ्यासाठी


तुमचा चेहरा गोल असेल, तर किंचित उंच आणि कमानदार भुवया तुमच्यासाठी योग्य पर्याय आहेत. या प्रकारच्या भुवयांमुळे तुमचा चेहरा लांब आणि अरुंद दिसतो, ज्यामुळे गोल चेहऱ्याची रुंदी कमी होण्यास मदत होते. 

हे केवळ तुमच्या चेहऱ्याला अधिक संतुलित लुक देत नाही तर तुमच्या एकूण लुकमध्ये सौंदर्य देखील वाढवते. त्यामुळे, पुढच्या वेळी तुम्ही थ्रेडिंगसाठी जाल तेव्हा कमानदार भुवया मागवा, ज्यामुळे तुमचे सौंदर्य आणखी वाढेल. 

अंडाकृती चेहऱ्यासाठी


अंडाकृती चेहरे हा आदर्श चेहरा मानला जातो. कारण त्यावर सर्व प्रकारच्या भुवया सुंदर दिसतात. तुमच्या भुवया सरळ, कमानदार किंवा गोलाकार असोत, प्रत्येक स्टाइल तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com