Expired झालेले पदार्थ, वस्तू फेकून देण्यापुर्वी ही बातमी वाचाच

प्रत्येक पदार्थांच्या पॅकेटवर एक्सपायरी (Expired Date) डेट लिहिलेली असते.
Expired झालेले पदार्थ, वस्तू फेकून देण्यापुर्वी ही बातमी वाचाच
Expired झालेले पदार्थ, वस्तू फेकून देण्यापुर्वी ही बातमी वाचाचDainik Gomantak
Published on
Updated on

आपल्या घरात असे अनेक पदार्थ असतात जे एक्स्पायर (Expire) झाल्यानंतर फेकून दिल्या जाते. पण तुम्हाला माहिती आहे का एक्स्पायर झालेल्या पदार्थांचा (Expire Food) वापर घरकामासाठी करता येतो. खाण्या-पिण्याच्या सर्वच वस्तूवर एक्स्पायरी डेट (Expire date) दिलेली असते. त्या पदार्थांचा वापर करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. म्हणून एक्सपायरी डेट निघून गेली की पदार्थ फेकून देतात. अशा पदार्थांचा वापर तुम्ही घरातील अनेक कामांसाठी करू शकता. प्रत्येक पदार्थांच्या पॅकेटवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते. यानंतर ते वापरता येत नाही. पदार्थ एक्सपायर झाल्यानंतर खाद्यपदार्थांमधील चव (Taste) बदलुन त्याच्या रंगात बदल होतो. तर अनेक पदार्थांना दुर्गंध देखील येतो. यामुळे असे पदार्थ खाणे टाळावे.

* चहा

चहा पावडर एक्सपायर झाल्यास आपण ती फेकून देण्याचा विचार करतो. परंतु असे न करता तुम्ही जर एक्सपायरी चहा पावडरचे पाणी गुलाबाच्या झाडांना टाकल्यास अनेक फूल येतात. तसेच गुलाबाच्या झाडाची वाद होण्यास मदत मिळते.

* मेयोनीज

मेयोनीजची एक्सपायरी डेट सपल्यास ते फेकून न देता त्याचा घरकामासाठी वापर करावा. याचा वापर फ्रीज किंवा किचनच्या ट्रॉलीमधील दाग स्वच्छ करण्यासाठी याचा वापर केला जातो. स्टीलच्या भांड्यावर मेयोनीज लावून ब्रशच्या मदतीने 10 मिनिटे घासावे. त्यानंतर पाणी टाकून कापडाने स्वच्छ करावे. यामुळे भाड्यावरील डाग कमी होण्यास मदत मिळते.

* कॉफी

एक्सपायरी झालेल्या कॉफीच वापर त्वचेसाठी आणि झाडांसाठी सुद्धा होतो. कॉफीचा वापर झाडांच्या खतासाथी सुद्धा करता येतो. तसेच त्वचेसाठी स्क्रब तयार करण्यासाठी सुद्धा वापर होतो. झाडासाठी खत तयार करतांना एका भांड्यात 1 चमचा कॉफी मातीत मिक्स करावी. हे मिश्रण तुम्ही कोणत्याही झाडासाठी वापरू शकता. फेस स्क्रब तयार करण्यासाठी 2 चमचे एलोवेरा जेल घ्यावे आणि एक चमचा कॉफी घ्यावी. याचे मिश्रण चांगले मिक्स करून चेहऱ्यावर लावावे. आणि हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करावी. 20 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. असे केल्याने चेहऱ्यावरील डेड स्कीन निघयन जाण्यास मदत मिळते.

* ब्राऊन शुगर

ब्राऊन शुगर जर कडक झाली असेल तर अनेक लोक ती फेकून देतात. याचा वापर त्वचा निरोगी ठेवण्यासाठी केला जातो. कडक झालेली ब्राऊन शुगर चांगली बारीक करून ठेवू शकता. याचा वापर फेस स्क्रब आणि बॉडी स्क्रब म्हणून वापर करता येतो. स्क्रब तयार करण्यासाठी ब्राऊन शुगरमध्ये गुलाबजल आणि बदाम तेल मिक्स करावे. या स्क्रबमुळे त्वचा मऊ होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com