Polycystic kidney Disease Treatment: पाठदुखी अन् डोकेदुखी असू शकते पॉलीसिस्टिक किडनीचे लक्षण, वेळीच डॉक्टरांशी साधा संपर्क

हा आजार आणूवंशिक असून लक्षण दिसतांच काळजी घेणे गरजेचे आहे.
Polycystic kidney Disease Treatment
Polycystic kidney Disease TreatmentDainik Gomantak

किडना हा युरिनरी सिस्टमचा मुख्य भाग आहे. यामुळे रक्त शुद्ध राहते. युरिनद्वारे शरीरातून टाकाऊ पदार्थाच्या रूपात बाहेर पडते. काही कारणाने किडनीच्या कार्यात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्याच्या (Health) समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पॉलीसिस्टिक किडनीचा आजार होण्याची शक्यता असते. पॉलीसिस्टिक किडनी रोग काय आहे आणि त्यावर उपचार कोणते हे जाणून घेउया.

पॉलीसिस्टिक किडनी डिसीजमुळे किडनीमध्ये मल्टिपल अल्सर (Cyst) विकसित होतात. यामुळे किडनीचा आकार आणि वजन वाढते. मूत्रपिंडाचे वजन वाढल्यास वृध्दंत्व वाढू शकते. हा सर्वात सामान्य मूत्रपिंडाचा विकार आहे. हा आजार आणूवंशिक असू शकतो.

जर दोन्ही पालकांना हा आजार असेल, तर मुलालाही हा आजार होण्याची 50% शक्यता असते. जर फक्त एका पालकाला हा आजार असेल, तरीही मुलाला हा आजार होण्याचा धोका 25% असतो. यामध्ये मुलाचा विकास होण्याऐवजी तो पुढच्या पिढीकडे जातो.

kidney health
kidney healthDainik Gomantak

पॉलीसिस्टिक किडनीचे लक्षणे

 • उच्च रक्तदाब होऊ शकतो.

 • सिस्ट संसर्गामुळे वेदना होऊ शकतात. आकारात वाढल्यामुळे सिस्टमध्ये अडचणी येउ शकतात. यामुळे सिस्टमध्ये रक्तस्त्राव किंवा संसर्ग होऊ शकतो.

 • युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) मुळे वारंवार युरिनची समस्या निर्माण होउ शकते. युरिन करतांना वेदना आणि ताप येऊ शकतो.

 • किडनी खराब होण्याची शक्यता असू शकते.

  पॉलीसिस्टिक किडनी डिसऑर्डर उपचार कोणते

 • उच्च रक्तदाब नियंत्रित करा

  पॉलीसिस्टिक किडनीच्या आजाराच्या बाबतीत उच्च रक्तदाब नियंत्रित करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी, डॉक्टरांद्वारे अँटीहाइपरटेन्सिव्ह औषधे लिहून दिली जाऊ शकतात.

 • निरोगी आहार

  खाण्याच्या सवयी सुधारणे खूप महत्वाचे आहे. तुमच्या आहारात पौष्टिक आणि सकस पदार्थांचा समावेश करा. तुम्ही निरोगी आहार आणि सक्रिय जीवनशैलीचे पालन सुरू करताच तुम्हाला फरक जाणवू लागेल.

 • नियमितपणे व्यायाम करा

  रोजच्या व्यायामाने अनेक आजार दूर राहतात. व्यायामाने वजन नियंत्रणात ठेवता येते. यामुळे पॉलीसिस्टिक किडनी विकार टाळता येऊ शकतो.

 • खारट अन्नाचे सेवन कमी करा

  ज्या पदार्थांमध्ये मीठ अधिक असते असे पदार्थ कमी खावे. किडनी निरोगी ठेवण्यासाठी मिठाचे संतुलित प्रमाणात सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या आहारात मीठाचे सेवन मर्यादित करा.

 • प्रोसेस्ड फुड हानिकारक

  प्रोसेस्ड केलेले, पॅकेज केलेले, फ्रोजन केलेले, जंक फूड, फास्ट फूड, आधीच तयार केलेले लोणचे किंवा रेस्टॉरंट फूडचे सेवन न केल्याने हा विकार टाळता येतो. जर तुम्हाला पॉलीसिस्टिक किडनी विकार असेल तर या पदार्थांचे सेवन पूर्णपणे बंद करा.

 • धूम्रपान, मद्यपान टाळा

  धूम्रपान ही सवय असेल तर ती सोडा. बिअर आणि वाईनसह सर्व अल्कोहोलयुक्त पेयांपासून दूर रहा. लाल मांस खाणे बंद करा. हे किडनीसाठी घातक असतात.

 • दर तीन महिन्यांनी तपासणी करणे आवश्यक

  दर तीन महिन्यांनी चेकअप करून तुमच्या प्रगतीचा मागोवा ठेवणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ते महत्वाचे आहे. कारण गळू देखील वाढू शकते, ज्यामुळे नंतर किडनी निकामी होऊन बिघडते. एकदा किडनी खराब झाल्यावर रुग्णाला

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com