प्रत्येकाला लांब, काळे आणि चमकदार केस आवडतात. 2018 च्या एका अभ्यासानुसार , 60.3% पुरुषांमध्ये केस गळणे, 17.1 टक्के पुरुषांमध्ये कोंडा आणि 50.4 टक्के पुरुषांमध्ये टक्कल पडणे अशा समस्या आढळून आल्यात. या अभ्यासात चेन्नईतील लोकांचा समावेश करण्यात आला होता. प्रदूषण, धूळ, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, चुकीची जीवनशैली, रासायनिक पदार्थांचा अतिवापर, ताणतणाव इत्यादी केस गळण्याचे प्रमुख कारण असू शकते. या सर्व घटकांमुळे केस गळणे, कोंडा होणे, टक्कल पडणे आणि केस खराब होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
केसगळतीची समस्या कमी करण्यासाठी बहुतेक लोक अनेक पद्धतींचा अवलंब करतात. मात्र तुम्हाला माहित आहे का वर्कआउट केल्याने फक्त शरीरच निरोगी राहत नाही तर, तुम्ही केललं वर्कआउट केसांच्या वाढीस देखील मदत होते.
तुम्हालाही केसांची वाढ करायची असेल किंवा केसगळतीपासून सुटका मिळवायची असेल, तर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत खाली नमूद केलेल्या व्यायामाचा समावेश करू शकता.
1.जॉगिंग (Jogging)
जॉगिंग हा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचा व्यायाम आहे, ज्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होत राहते. जर कोणी सकाळी उठून जॉगिंगला गेला तर त्याच्या रक्ताभिसर प्रक्रियेत सुधारणा होऊन केसांची वाढ होऊ शकते. काही तज्ञ डोक्यातील ब्लड सर्कुलेशन वाढवण्यासाठी 30 मिनिटे जॉगिंग करण्याचा सल्ला देतात.
2. हाय इंटेंसिंटी इंटरनेवल ट्रेनिंग (HIIT Exercises)
हाय इंटेंसिंटी इंटरनेवल ट्रेनिंग कार्डिओ आणि स्ट्रेंथ प्रशिक्षण एकत्र केले जाते. त्यासाठी खूप उर्जेची आणि ताकदीची गरज असते. दैनंदिन जीवनात या व्यायामाचा समावेश केल्यास केसांच्या वाढीसाठी खूप फायदा होऊ शकतो. केसांच्या वाढीसाठी खाली सांगितलेल्या HIIT व्यायामांचा समावेश केला जाऊ शकतो.
बर्पी
स्क्वॅट
क्रंचेज
पुश-अप्स
जंपिंग जैक
माउंटेन क्लाइंबिंग
हे व्यायाम 30 सेकंद सतत करा. प्रत्येक व्यायामानंतर 10 सेकंद विश्रांती घ्या. जर तुम्ही सर्व व्यायाम एकदा केले तर 1 सेट तयार होईल. आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल.
3. स्ट्रेंथ ट्रेनिंग (Strength Training)
जर तुम्हाला हाई इंटेंसिटी एक्सरसाइज करायची नसेल तर तुम्ही जिममध्ये जाऊन वेट ट्रेनिंग घेऊ शकता. वेट ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया वाढू शकते, ज्यामुळे केस वाढण्यास मदत होते. स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये तुम्ही बेंच प्रेस, स्क्वॅट, डेडलिफ्ट यासारखे व्यायाम करू शकता.
4. कार्डियो (Cardio)
कार्डिओ व्यायाम केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे म्हटले जाते, कारण यामुळे शरीरात तसेच डोक्यात ब्लड सर्कुलेशन योग्य पद्धतीने होते. कार्डिओ व्यायामामध्ये धावणे, सायकल चालवणे, चालणे इत्यादी व्यायामाचे प्रकार करता येतात.
5. स्टॅंडिंग फोल्ड पोज (Standing Fold Pose)
केसांच्या वाढीसाठी स्टँडिंग फोल्ड पोज खूप फायदेशीर ठरू शकते. ही मुद्रा तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी मदत करते. एका संशोधनानुसार तणाव हे केसांच्या समस्यांचे मुख्य कारण आहे. त्यामुळे स्टँडिंग फोल्ड पोजने ताण कमी करून केसांची वाढ होऊ शकते.
6. स्कॅल्प मसाज (Scalp massage)
डोक्यामधील रक्ताभिसरण वाढवण्यासाठी टाळूवर मसाज करा. यामुळे केसांच्या वाढीसाठी खूप मदत होते. मसाजसाठी नैसर्गिक तेलाचा वापर करा.
ही काळजी घेणे आवश्यक आहे
केसांची वाढ, केस गळणे, पांढरे होणे किंवा कोंडा होणे या समस्या फक्त व्यायाम केल्याने दूर होणार नाही.केसांच्या वाढीसाठी प्रथिनयुक्त आहार, जीवनसत्त्व-खनिजांचे सेवन, उत्तम जीवनशैली, प्रदूषणमुक्त वातावरण, कमी तणाव, रासायनिक पदार्थांचा कमी वापर इत्यादी गोष्टींची काळजी घ्यावी लागते. या सर्व घटकांचे योग्य संतुलन केसांच्या आरोग्यासाठी चांगले असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.