Excessive Daytime Sleepiness: सतत झोप येत असेल तर वेळीच सावध व्हा

Excessive Daytime Sleepiness: आपल्या इतर गरजांप्रमाणेच योग्य प्रमाणात झोप घेणे हीदेखील शरिराची अत्यंत महत्वाची गरज आहे.
Excessive Daytime Sleepiness
Excessive Daytime SleepinessDainik Gomantak
Published on
Updated on

Excessive Daytime Sleepiness: आपल्यापैकी अनेकांना सातत्याने झोप येते. दिवसभर ते आळस देताना दिसतात. यामुळे तुमची रोजची कामे मंदगतीने होतात. तुम्ही नोकरी करत असताना देखील तुम्हाला सतत झोप येत असेल तर तुमची वेगळी प्रतिमा तयार होऊ शकते. त्याचे वाईट परिणाम देखील होऊ शकतात. अनेकांना सतत झोप येण्याचे कारणदेखील माहीती नसते.

चला तर जाणून घेऊयात सतत झोप येण्याचे कारण काय आहे?

1. तुमची झोप पूर्ण होत नाही. तुम्ही अत्यंत कमी झोप घेतल्यामुळेदेखील तुम्हाला सतत आळस येऊ शकतो. आपल्या इतर गरजांप्रमाणेच योग्य प्रमाणात झोप घेणे हीदेखील शरिराची अत्यंत महत्वाची गरज आहे.

2. तुम्ही मोबाइल, लॅपटॉपचा जास्त वापर करत असाल तर तुमचा स्क्रीन टाइम जास्त होतो, त्यामुळेदेखील तुमची चांगली झोप होत नाही.

3. तुम्ही अशक्त झाला असाल तरीदेखील तुम्हाला सातत्याने आळस येतो.

4. तुमच्या शरिरात रक्ताची कमतरता असेल तरीदेखील तुम्हाला सातत्याने झोप येऊ शकते.

5. जर तुम्ही निद्रानाशाचा सामना करत असाल तरीदेखील तुम्हाला सतत झोप आल्यासारखे वाटते.

6. तुमचा आहारदेखील महत्वाची भूमिका निभावतो. तुमच्या आहारात जर सतत बेकरीचे पदार्थ असतील, प्रोसेस्ड पदार्थ असतील, गोड किंवा साखरेचा प्रमाणापेक्षा वापर तुमच्या रोजच्या जेवणात वापर असेल तर त्याचा परिणाम तुमच्या शरिरावर होतो तसा तो झोपेवरदेखील होतो.

७. तुम्ही नैराश्याचा सामना करत असाल तरीदेखील तुम्हाला झोपेची समस्या निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही सतत झोपेत असल्यासारखे वाटते.

८. जास्त कष्टाचे किंवा जास्त थकवा आणणारे तुम्ही काम करत असाल, याबरोबरच तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम करत असाल तरीदेखील तुमच्या शरिराला ते श्रम भरुन काढण्यासाठी योग्य वेळ मिळाला नाही तरीदेखील तुम्हाला सतत झोप येते.

९. जर तुम्ही कोणत्याही ताणतणावातून जात असाल तरीदेखील त्याचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर होतो. त्याचा परिणाम तुमच्या झोपेवर होतो आणि झोप पूर्ण झाली नाही तर त्याचा परिणाम तुमच्या पुढच्या दिवसावर होतो.

१०. जर तुम्ही कोणत्या आजाराचा सामना करत असाल, जसे हृदयविकार, कँन्सर, थायरॉड, संसर्गजन्य आजार, मोनोपॉज, अॅनेमिया, गरोदरपणा यामुळे देखील तुम्हाला सतत तुम्हाला झोप येऊ शकते.

११. तुम्ही कोणती औषधे घेत असाल तरीदेखील तुम्हाला सतत झोप आल्यासारखे वाटू शकते.

यावर उपाय काय आहे?

1. पुरेसे पाणी पिणे आणि पोषक अन्नाचे सेवन करणे महत्वाचे आहे.

२. दारु आणि अन्य व्यसनाचे प्रमाण कमी करा.

३. कॉपी किंवा कॉफीयुक्त पदार्थांचे तसेच साखरेचे जास्त पदार्थ खाणे टाळा.

४. ध्यान करा.

५. झोपण्यापूर्वी स्ट्रेचिंग करा.

६. स्वच्छ आणि शुद्ध हवा, पुरेसा सुर्यप्रकाश आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा प्रयत्न करा.

७. आजारांचे योग्य तज्ञांकडून निदान करा, घरीच उपचार करण्यावर आणि कोणत्याही सल्ल्याशिवाय मेडिकलमधून औषधे घेऊ नका.

८. जर तुम्ही नैराश्याचा सामना करत असाल तर त्यातून मार्ग काढण्यासाठी समुपकदेशकाची मदत घ्या .

किती तास झोप घेतली पाहिजे?

तज्ञांच्या मते, १८ ते ६० वयोगटातील लोकांनी ७ तास झोप घेतली पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com