कलासंस्कृतीतला एव्हर् ग्रीन

टक ही अशी कला आहे. जिच्याकडे काही कलाकार साधना म्हणून बघत असतात. रंगमंच हेच त्यांचे जीवन असते. वयाची पर्वा न करता ते रंगमंचावर उत्साहाने वावरत असतात.
Goa Art Cultuer : रंगकर्मी महादेव उर्फ आपा खानोलकर
Goa Art Cultuer : रंगकर्मी महादेव उर्फ आपा खानोलकर Dainik Gomantak
Published on
Updated on

टक ही अशी कला (Art) आहे. जिच्याकडे काही कलाकार साधना म्हणून बघत असतात. रंगमंच हेच त्यांचे जीवन असते. वयाची पर्वा न करता ते रंगमंचावर उत्साहाने वावरत असतात. फोंड्याचे (Ponda) एक रंगकर्मी महादेव उर्फ आपा खानोलकर हे अशापैकीच एक. वयाची पंचाहत्तरी ओलांडली तरी ते अजूनही हिरिरिने रंगमंचावर विविध भूमिका निभावताना दिसतात.

Goa Art Cultuer : रंगकर्मी महादेव उर्फ आपा खानोलकर
जाणून घ्या काय आहे IVF फर्टिलिटी ट्रीटमेंट

वयाच्या सोळाव्या वर्षापासून सुरू झालेला त्यांचा नाट्यप्रवास अजूनही अबाधित आहे. फोंड्याच्या विठोबा देवळासमोर संपन्न होणाऱ्या शिशिरोत्सव हा आपांच्या नाटकांचा प्रमुख आगर. १९६२ च्या ‘डॉ. कैलास’ या नाटकापासून सुरू झालेला त्यांचा नाट्यप्रवास आता २०२१ सालच्या ‘दुरितांचे तिमिर जावो’ या नाटकापर्यंत पोहचला आहे. ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’, ‘अपराध मीच केला’, ‘दिल्या घरी तु सुखी रहा’, ‘वेगळे व्हायचे मला’, ‘अंमलदार’, ‘सख्खेभाऊ पक्के वैरी’, ‘काळे बेट लाल बत्ती’, ‘कथा कोणाची व्यथा कोणा’ अशा व्यावसायिक रंगभूमीवर गाजलेल्या मराठी नाटकांचे प्रयोग त्यानी शिशिरोत्सवात सादर करून टाळ्या घेतल्या आहेत. ‘अपराध मीच केला’ मधला गोळे मास्तर,’दिल्या घरी....’ मधला मामा, ‘दुरितांचे तिमिर जावो’ मधला सदू, ‘काळे बेट...’ मधला भोपेशास्त्री, ‘धाव मरे धाव’ मधला बाबुराव गवळी या त्यांच्या काही अतिशय आवडत्या भूमिका.

Goa Art Cultuer : रंगकर्मी महादेव उर्फ आपा खानोलकर
सिनेमा अभिनय ऑडिशन....

हौशी रंगभूमीसारखेच त्यांनी स्‍पर्धात्मक रंगभूमीही गाजवली आहे. ‘काळे बेट लाल बत्ती’, ‘कथा कोणाची व्यथा कोणा’, ‘तन माजोरी’ या त्यांच्या नाटकांना कला अकादमी स्पर्धेत पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘काळे बेट लाल बत्ती’ हे त्यांचे नाटक तर महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत पुरस्कार प्राप्त ठरले होते. त्यातल्या भोपेशास्त्रींच्या भूमिकेकरिता आपावर अनेक स्पर्धांतून पुरस्कारांची खैरातच झाली होती. नाट्य क्षेत्रासारखाच सिनेक्षेत्रात ही आपांनी आपला ठसा उमटविला आहे. ‘तुच म्हजी लक्ष्मी’, ‘हास मारे हास’, ‘दिसता तशें नासता’, ‘गणपती बाप्पा मोरया’ हे त्यांचे काही लोकप्रिय कोंकणी चित्रपट. दुसऱ्या राज्य चित्रपट महोत्सवात आपाना तीन पुरस्कार प्राप्त झाले होते.

Goa Art Cultuer : रंगकर्मी महादेव उर्फ आपा खानोलकर
का होतो प्रेशर कुकरचा स्फोट; जणून घ्या करणे

दिसता तशें नासता हा चित्रपट तर दुसऱ्या पुरस्कराचा मानकरी ठरला होता. ‘मस्त कलंदर’ ही त्यांनी निर्मित केलेली, गोव्याच्या एका वाहिनीवरून प्रसारित होणारी, तेरा भागांची ही पहिलीच मालिका हिट ठरली होती.

त्यांनी नाट्यकलेला दिलेले योगदान लक्षात घेऊन गोवा सरकारने त्यांना प्रतिष्ठेच्या कला सांस्कृतिक राज्य पुरस्काराने भूषविले आहे. नाटक ही एक तपश्‍चर्या असून ती साध्य करण्याकरिता सातत्य हवे, तसेच परिश्रम करण्याची तयारी हवी असे खानोलकर सांगतात. नाटक हे माझे ‘टॉनिक’ असून त्यामुळे आपल्या वयाची जाणीव होत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्याकडे पाहून त्यांचे हे म्हणणे पटतेच.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com