Evening Snacks: संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा अमृतसरी पनीर टिक्का

काही तरी वेगळं खायचा विचार करत असाल तर ट्राय करा अमृतसरी पनीर टिक्का.
Evening Snacks| Paneer tikka
Evening Snacks| Paneer tikkaDainik Gomantak

Paneer Tikka Recipe: पंजाबी पदार्थ त्याच्या चटपटीत-तिखट चवीमुळे जगभरात खूप आवडतात. जर तुम्हालाही तुमच्या तोंडाची चव सुधारण्यासाठी संध्याकाळी हेल्दी आणि चटपटीत काहीतरी खायचे असेल तर संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये चविष्ट अमृतसरी पनीर टिक्का (Paneer Tikka) बनवा. ज्यांना पनीर आवडते त्यांच्यासाठी ही पंजाबी स्टार्टर रेसिपी खूप आवडेल. अमृतसरी पनीर टिक्का कसा बनवायचा चला तर मग जाणून घेऊया .

  • अमृतसरी पनीर टिक्का बनवण्यासाठी लागणारे साहित्य

500 ग्राम पनीर

8 चमचे बेसन

1/2 चिमूटभर काळी मिरी

6 चमचे सुकी मेथीची पाने

2 चमचे चिली फ्लेक्स

1 चिमूटभर दालचिनी

1 चमचा ओवा

1 टीस्पून आले पेस्ट

4 टीस्पून लिंबाचा रस

1/2 कप रिफाइंड तेल

1 टीस्पून साखर

1 टीस्पून लसूण पेस्ट

मीठ आवश्यकतेनुसार

गरजेनुसार पाणी

Evening Snacks| Paneer tikka
Rose Day Special 2023: व्हॅलेंटाईन डेचा पहिला दिवस बनवा गुलाबापासून बनलेल्या स्वादिष्ट पदार्थांनी खास
  • अमृतसरी पनीर टिक्का कसा बनवायचा

अमृतसरी पनीर टिक्का बनवण्यासाठी सर्वात पहिले नॉन-स्टिक पॅन मंद आचेवर गरम करा आणि तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात ओवा टाका. आता पॅनमध्ये चिली फ्लेक्स टाका आणि आणखी काही सेकंद भाजा.

यानंतर दालचिनी पावडरमध्ये आले-लसूण पेस्ट मिक्स करून काही सेकंद भाजून घ्यावे. लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आणखी एक मिनिट भाजल्यानंतर त्यात बेसन घाला. बेसनाचा रंग तपकिरी होईपर्यंत 2 मिनिटे तळून घ्या. बेसन तपकिरी झाल्यावर त्यात कसुरी मेथी टाकून एक मिनिट परतून घ्यावे. आता तुमच्या चवीनुसार मीठ आणि काळी मिरी घालून नीट मिक्स करा. थोडा वेळ शिजल्यानंतर गॅस बंद करा आणि हे साहित्य एका खोलगट भांड्यात ठेवावे.

आता एका भांड्यात लिंबाचा रस सोबत साखर घाला आणि सर्व काही चांगले मिक्स करा. नंतर पनीरचे चौकोनी तुकडे करा. आता पॅनमध्ये पनीरचे चौकोनी तुकडे घाला आणि हलक्या हाताने मिक्स करा. चांगले कोट करा आणि सुमारे 30 मिनिटे मॅरीनेट करा.

आता एका नॉन-स्टिक पॅनमध्ये तेल गरम करून त्यात पनीरचे चौकोनी तुकडे घाला. पनीरचे तुकडे हलका रंग येईपर्यंत मध्यम आचेवर थोडा वेळ शिजवा. एका बाजूने रंग हलका झाला की, उलटा करून कुरकुरीत होईपर्यंत शिजवा. सर्व पनीरचे चौकोनी तुकडे शिजल्यावर सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करुन आस्वाद घेउ शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com