Electricity Bill: वाढत्या वीज बिलाने त्रस्त आहात? फॉलो करा 'या' बेसिक टिप्स, बिल येईल अर्ध्यापेक्षा कमी

अनेकदा वीज बिल जास्त आल्याने अनेकजणांचे आर्थिक गणित बिघडते.
Electricity Bill:
Electricity Bill: Dainik Gomantak
Published on
Updated on

Electricity Bill: सध्या अनेक ठिकाणा ऊन पावसाचा खेळ सुरु आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये वाढत्या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जारी करण्यात आला असून लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

घरांमध्ये राहिल्याने लोक एसी, कुलरचा अतिवापर करत असल्याने विजेचा वापर वाढला आहे. यामुळे वाढत्या वीज बीलाची काळजी लोकांना वाटते. काही टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचे वीज बिल कमी करू शकता. 

अनेक वेळा विजेच्या चुकीच्या वापरामुळे वीज बिल जास्त येऊ लागते. तुमच्या इलेक्ट्रिकल उपकरणांमध्ये काही बदल करूनही तुम्ही तुमचे वीज बिल कमी करू शकता. 

जर तुमचा एसी खूप जुना किंवा नॉन-इन्व्हर्टर एसी असेल आणि त्याचे रेटिंग खूप कमी असेल, तर तुमचे वीज बिल जास्त असेल. हे कमी करण्यासाठी, एकतर तुम्ही इन्व्हर्टर एसी लावू शकता किंवा तुम्ही तुमच्या जुन्या एसीचे तापमान 24 ते 25 अंशांनी चालवू शकता. यामुळे तुमचा एसी जास्त वीज वापरणार नाही. तसेच विंडो एसीही वापरू नये. याचा वापर केल्यास तुमचे वीज बिल वाढू शकते. तुम्ही हाय रेटिंगसह इन्व्हर्टर एसी वापरून तुमचे वीज बिल कमी करू शकता. याशिवाय सीएफएल बल्ब काढून एलईडी बल्ब वापरु शकता. यामुळे तुम्हाला वीज बिलातही मोठा दिलासा मिळु शकतो.  

Electricity Bill:
PM Modi State Dinner in US: PM मोदींसाठी व्हाईट हाऊसमध्ये खास डिनर, मिलेट केकसह 'या' स्पेशल पदार्थांचा समावेश...

मग ती तुमच्या घरातील विजेची तार असो किंवा तुम्ही वापरत असलेली कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू असो ते नेहमी ISI चिन्हाने खरेदी करावे. त्याचे एनर्जी बीईई लेव्हलचे उपकरणच घ्यावे. असे उपकरण वापरल्याने वीज बीस कमी येते.  

आपल्या स्वयंपाकघरात वेंटिलेशनचा वापरू नका. त्यामुळे वीज बिल जास्त येते. त्याऐवजी एक्झॉस्ट फॅन वापरावा. यामुळे खूप कमी वीज लागते.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे घरातील पंखे कोणीही वारंवार बदलत नाही, परंतु तुम्हाला माहीत आहे का की जुन्या मॉडेलचे पंखे 90 वॅटपर्यंत वीज वापरतात. सर्वप्रथम Power saving करणारे पंखे वापरावे. तसेच गरज नसताना फॅन आणि लाईट बंद ठेवावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com