

Kiss Day 2023: व्हॅलेंटाइन वीक हा ७ फेब्रुवारीपासून सुरु झाला आहे. आज सातवा दिवस किस म्हणून साजरा केला जातो.
किस डे निमित्त तुम्ही तुमच्या पार्टनला स्वत: केक बनवून सरप्राइज देउ शकता. चला तर मग जाणून घेऊया घरी एग्लेस चॉकलेट केक कसे बनवावे.
एगलेस चॉकलेट केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य
1/3 कप कोको पावडर
1/3 कप गरम पाणी
1/3 कप वनस्पती तेल
½ कप दही
½ कप बेकिंग पावडर
¼ कप बेकिंग सोडा,
¾ कप मैदा
¾ साखर
1 टीस्पून कॉफी पावडर.
एगलेस चॉकलेट केक बनवण्याची पद्धत
घरच्या घरी एगलेस चॉकलेट केक बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे. एगलेस चॉकलेट केक बनवण्यासाठी पहिले एका भांड्यात गरम पाणी घ्यावो. आता त्यात कोको पावडर आणि कॉफी पावडर घालून चांगले मिक्स करावे आणि मिश्रण चमच्याच्या साहाय्याने हलवत राहा जोपर्यंत त्याची स्मूद पेस्ट होत नाही.
आता या मिश्रणात साखर, दही आणि वनस्पती तेल घालून पुन्हा काही वेळ फेटून घ्यावे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही केकच्या बॅटरमध्ये तूप किंवा लोणीही घालू शकता. काही वेळ फेटल्यानंतर त्यात बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मैदा एकत्र करून पुन्हा फेटून घ्या.
आता हे बॅटर सहा मिनिटे मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. तुमचा चविष्ट, स्पंजी केक तयार आहे. केकवर चॉकलेट लावून , नट्स टाकून सजवू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.