Egg Hair Mask For Shine
Egg Hair Mask For ShineDainik Gomantak

Egg Hair Mask For Shine: निरोगी अन् चमकदार केसांसाठी अंडे का फंडा, घरीच बनवा हेअर मास्क

जर तुम्हाला सुंदर आणि चमकदार केस हवे असतील तर तुम्ही अंड्याचा वापर करू शकता.
Published on

egg hair mask for shine and silky hair read how to use

अंडी खाणे शरीरासह केसांसाठी देखील फायदेशीर आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. असे मानले जाते की अंड्यांमध्ये आढळणारे पोषक घटक शरीरासाठी फायदेशीर असतात. यामुळे डॉक्टरही लोकांना अंडी खाण्याचा सल्ला देतात.

अंडे खाल्ल्याने केस आतील बाजूने मजबूत होतात, परंतु असे बरेच लोक आहेत जे अंड्याचे सेवन करत नाहीत. अशावेळी ते अंड्याचा हेअर मास्क बनवून केसांना लावू शकतात. अंड्यापासून हेअर मास्क कसा बनवावा हे जाणून घेऊया.

अंडे आणि खोबरेल तेल

अंड्यामध्ये तेल किंवा खोबरेल तेल मिक्स करावे. हा मास्क केसांना लावल्याने केसांची आर्द्रता टिकून राहते. यामुळे केस मऊ होतात.

अंडे आणि कोरफड जेल

तुम्ही अंड्यामध्ये एक चमचा कोरफड जेल टाकून केसांना लावू शकता. यामुळे केस चमकदार आणि मजबुत होतात.

अंडे आणि जोजोबा तेल

हा मास्क बनवण्यासाठी सर्वात पहिले अंड्यामध्ये जोजोबा तेल मिक्स करून एक मास्क बनवावा. काही वेळ लावल्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवावे. हा मास्क केसांना लावल्याने केस मजबूत आणि चमकदार होतात.

अंड आणि आवळा

हा मास्क बनवण्यासाठी सर्वात पहिले दोन अंडे चांगले फेटून त्यात एक चमचा आवळा पावडर मिक्स करावे. नंतर हा मास्क केसांना मुळापासून वरपर्यंत पूर्णपणे लावावा. केसांसाठी हे खूप फायदेशीर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com