

keep Your Mood Better: माहामारीच्या काळात अनेकजण तणावपूर्ण वातावरणात, निराशजनक परिस्थितित आयुष्य जगत आहेत. अशा वेळी आपले मूड (Mood) खराब असेल तेव्हा काही तरी गोड खाण्याची इच्छा होते. तसेच कधी कधी आपण सुपर हाय कॅलरी (Super high calorie) असलेले फूड (Food) खाण्यासाठी शोधतो. परंतु असे पदार्थ खाणे आरोग्यासाठी हानिकारक (Harmful to health) असतात. पण वैतिरिक्तदेखील अनेक पदार्थ आहेत ज्यामुळे आपला मूड एकदम चांगला होऊ शकतो. आणि ते आपल्या शरीरसाठी लाभदायी असते. काही दिवसांपूर्वी फूड (Food) आणि मूड (Mood) यांच्यातिल संबंधात रिसर्च केल होता. त्यात असे आढळून आले की निराश होण्यांचे अनेक करणे असू शकतात. सतत ताणावात राहणे, झोप अपुरी होणे, मूड डिसऑर्ड अशा अनेक परिस्थितित मूड चांगला करण्यासाठी अनेक पदार्थाचा किती उपयोग होतो हे सागण कठीण आहे. परंतु असे काही पदार्थ आहेत जे आपला मूड चांगला करण्यास मदत करतात. कोणती आहेत ती पदार्थ जाणून घेऊया. (Eating these healthy foods will make you feel better!)
Side Effects of Basil: तुळशीचे असेही आहेत दुष्परिणाम
1) ओट्स : या मध्ये मुबलक प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे ब्लड शुगर ची पातळी स्थिर राहते आणि मूड एकदम चांगला (Fresh) होतो. ओट्समध्ये लोह भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे मूड स्विग सिस्टिमवर नियंत्रण राहते. सकाळच्या नाश्तामध्ये दूध, मध आणि मनुका यांच्या सोबत ओटस खाल्ले की पूर्णदिवस मूड चांगला राहतो.
2) अंडी: अंडी देखील मूड चांगले ठेवण्यात मदत करते. अंड्यातिल लेसिथिनमुळे मूड कंट्रोल होतो. यामध्ये कोलिन नावाचा पोषक घटक असतो. यामुळे मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते. अंड्यातील व्हिटमिन बी 12 निराशेटून बाहेर कध्यास मदत करते.
3) डार्क चॉकलेट: चॉकलेट हे सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. चॉकलेटमुळे मूड चांगला होतो. कारण यामध्ये मूड बुस्टर कॉम्पोनेंट असतात. यामुळे मेंदूतला रक्त प्रवाह वाढण्यास मदत होते. तसेच मेंदुमधील फिलगुड केमिकल हे अॅक्टिव होतात. यामुळेच मूड खराब असला तरी एका झटक्यात चांगला होतो.
4) कॉफी: कॉफी हे सर्वांच अवडात पेय आहे. कॉफी पिल्याने थकवा दूर होतो. तसेच त्यातील कफीन नावाच्या घटकामुळे मूड चांगला होण्यास मदत होते. दिवसभरात दोन वेळा कॉफी पिल्यास मूड एकदम चांगला राहतो.
5) अक्रोड: आक्रोडमुळे मेंदूतील सेरोटोनिनची पातळी वाढण्यास मदत होते. कारण यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिडस आणि मॅग्नेशियम असते. ताणतणाव कमी करण्यासाठी आक्रोड गुणकारी आहे. तसेच यामुले मूड चांगला राहण्यास मदत होते. चांगली झोप येण्यासाठी देखील अक्रोड फायदेशीर आहे.
6) ग्रीन टी: ग्रीन टीमध्ये मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडेंट आणि अमीनो ऍसिड असतात. त्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते. ग्रीन टी चे अनेक फायदे आहेत. त्यातील एक महत्वाचा म्हणजे मूड चांगला करण्यास ग्रीन टी फायदेशीर आहे.
7) केळी: केली हे फळ बारमाही फळ आहे. केळीमध्ये कार्बोहायड्रेट्स, पोटॅशियम, आणि मॅग्नेशियम असे अनेक पोषक घटक असतात. यामुले ब्लड शुगर कंट्रोल करमण्यास मदत करते. तसेच मूड चांगला ठेवण्यास देखील मदत करते.
8) सुकामेवा: यामध्ये काजू, बदाम, पिस्ता, मानूके इतर अनेक पदार्थ येतात. या सर्व सुकामेवामध्ये प्रोटिन, हेल्डी फट, फाईबर, सेलेनियम असे अनेक घटक असतात. यामुळे स्मरणनशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच ब्रेनचे फंक्शन चांगले करून मूड एकदम चांगला करण्यास मदत होते.
9) फॅटी फिश : मासे खाणे आरोग्यासाठी चांगले असते. तसेच याच फायदा मूड चांगला ठेवण्यासाठी देखील होतो. या माशामध्ये व्हिटॅमिन डी आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् हे घटक असतात. यामुळे मेंदूतील सेरोटोनिनची पातळी वाढण्यास मदत होते. याचा डिप्रेशन कमी करण्यासाठी फायदा होतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.