Eating Less Tips
Eating Less Tips Dainik Gomantak

Eating Tips : काय सांगता? भूक लागल्यावर फक्त तुमच्या आवडत्या पदार्थाचा फोटो पाहूनच भरेल पोट...

एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, जेवणाचे फोटो पाहूनही भूक शमवली जाऊ शकते.
Published on

Eating Less Tips : भूक लागली की कुठूनही काहीही खायला मिळावे असे वाटते. जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपण अजिबात आवडत नसलेल्या गोष्टी देखील खायला तयार असतो. आजकाल प्रत्येक गल्ली-कोपऱ्यात नवनवीन रेस्टॉरंट्स उघडली आहेत.

पण अनेक वेळा आपण अशा परिस्थितीत अडकतो जेव्हा आपल्या आजूबाजूला खायला काहीच नसते आणि खाद्यपदार्थांची दुकानेही बंद असतात. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा तुमचा स्टॅमिनाही कमी होतो. पण तुम्हाला माहीत आहे का की अशा परिस्थितीत तुमच्या आवडत्या पदार्थाचा फोटो पाहूनही तुमचे पोट भरू शकते?

Eating Less Tips
Weight Loss: आवडीचे पदार्थ खा बिनधास्त! 'या' स्मार्ट ट्रिक्स वापरल्यास वाढणार नाही वजन

एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, जेवणाचे फोटो पाहूनही भूक शमवली जाऊ शकते. 'एपेटाइट' नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, तुम्ही जेवढ्या वेळा जेवणाचे फोटो पाहतात, तितकी तुमची भूक कमी होते.

फोटो 30 पेक्षा जास्त वेळा पाहिल्यास तुम्हाला फायदा मिळेल

या अभ्यासाचे लेखक जार्क अँडरसन यांनी सांगितले की, या संशोधनाच्या निष्कर्षांनुसार, ज्या सहभागींनी अन्नाचा फोटो 30 पेक्षा जास्त वेळा पाहिला, त्यांना त्यांचे पोट अधिक भरलेले वाटले. या अभ्यासादरम्यान, ज्या लोकांनी अनेक वेळा अन्नाचे चित्र पाहिले त्यांनी कमी अन्न खाल्ले. या अभ्यासात सहभागी लोकांना काहीही न खाता पोट भरल्यासारखे वाटत होते.

नुसती कल्पना करून....

आरहस युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार, मेंदूच्या संशोधनातील 'ग्राउंडेड कॉग्निशन थिअरी'वरून या अभ्यासाचे परिणाम तुम्ही चांगल्या प्रकारे समजू शकता. कल्पना करा की तुम्ही कच्च्या आंब्याचे तुकडे खात आहात आणि त्यावर थोडी मिरची आणि मीठ शिंपडले आहे.

नुसती कल्पना केली तर तुम्हाला असे वाटेल की तुम्ही खरोखरच कच्चा आंबा खात आहात. जार्क अँडरसन यांनी सांगितले की, अन्नाची कल्पना करून, तुम्हाला जेवढा प्रतिसाद मिळतो तसाच प्रतिसाद प्रत्यक्षात खाल्ल्याने मिळेल. यामुळेच जेवणाचा फोटो पाहून पोट भरल्यासारखे वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com