Pears Health Benefits: नाशपाती आरोग्यासह त्वचेसाठी फायदेशिर

सफरचंदाचा एक प्रकार म्हणजेच नाशपाती देखील आरोग्यासह त्वचेसाठी फायदेशिर आहे.
Pears Health Benefits
Pears Health BenefitsDainik Gomantak

भाज्या आणि फळे केवळ आपल्या आरोग्याची काळजी घेत नाहीत तर त्वचेला फायदा मिळतो. याशिवाय शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी फळेही खूप प्रभावी आहेत. डॉक्टर रोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. सफरचंद हे आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, पण माहित आहे का सफरचंदाचा एक प्रकार म्हणजेच नाशपाती देखील फायदेशिर आहे. (Pears Health Benefits News)

त्यात भरपूर प्रमाणात फायबर असते. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती चांगली राहुन तर केस आणि त्वचेसाठीही (Skin) खूप फायदेशीर आहे. बर्‍याच गुणधर्मांनी युक्त असणारी नाशपाती तुमच्या त्वचेवरील वृद्धत्वाचा प्रभाव कमी करते. तुम्हाला जर वजन संतुलित ठेवायचे असेल तर याचे सेवन करावे. नाशपातीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामध्ये अति-प्रभावी अँटिऑक्सिडेंट, व्हिटॅमिन के आणि कॉपर यांसारखे पोषक असतात. त्यामुळे त्वचेला टोनिंग होण्यास मदत होते आणि सुरकुत्या दूर राहतात .

Pears Health Benefits
Relationship Tips: पार्टनरसोबत असा करा वीकेंड खास

चेहऱ्यावर कसे लावायचे

तुम्ही एक नाशपाती ताजे मलाई आणि मध मिक्स करून पेस्ट बनवू शकता आणि नंतर त्वचेवर लावू शकता. आठवड्यातून तीनदा फेस मास्क म्हणून वापरल्याने त्वचा चमकदार होते. तुमच्या फेस पॅकमध्ये मिसळल्यास ही पेस्ट नैसर्गिक स्क्रबर म्हणूनही मदत करू शकते. फळांचा अर्क मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. कोरड्या आणि निर्जीव त्वचेशी लढण्यास मदत करते. तसेच मॉइश्चरायझिंग लोशन बनवण्यासाठी नाशपातीचा अर्क वापरला जातो.

कोणत्याही फळापासून (Fruits) जास्तीत जास्त फायदा मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते कच्चे खाणे. तुम्ही याचे सेवन सॅलडमध्ये करू शकता. थोडे मीठ आणि लसूण घालून प्युरी करू शकता, डिप किंवा टॉपिंग म्हणून वापरू शकता. तसेच स्मूदी देखिल बनवू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com