Easy Korean Food : जर कोरियन स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर हे 5 पदार्थ नक्की करून बघा!

कोरियन लोक काय खातात याबद्दल सर्वांनाच जास्त उत्सुकता आहे.
Easy Korean Food to make
Easy Korean Food to makeDainik Gomantak
Published on
Updated on

BTS आणि BlackPinkच्या आकर्षक बीट्सपासून ते हृदयद्रावक K-Drama मुळे कोरियन संस्कृतीने आपल्या सर्वांना मोहित करून टाकले आहे. हल्ली सगळ्यानाच कोरियन संस्कृतीचे इतके वेड आहे की आपल्याला त्याबद्दल सर्व जाणून घ्यायचे आहे. विशेषत: खाद्यपदार्थ म्हणून, कोरियन लोक काय खातात याबद्दल सर्वांनाच जास्त उत्सुकता आहे.

जर तुम्ही विचार करत असाल की कोरियन नाश्ता कसा असतो, तर आम्ही तुमच्यासाठी काहीतरी सोप्या कोरियन डिशेस आणल्या आहेत, जय तुम्हीही तुमच्या घरी करून बघू शकता.

(Easy Korean Food to make)

Easy Korean Food to make
Yamaha RX100 देणार इतर बाईक कंपन्यांना टक्कर; नवीन बाईक बाजारात लॉंच

1. डालगोना कॉफी (Dalgona Coffee) :

लॉकडाऊन दरम्यान डालगोना कॉफी सर्वत्र खूपच फेमस झाली होती. फेसाळ आणि मजबूत कॉफी, साखर आणि गरम पाणी एकत्र करून तयार केली जाते आणि थंडगार दुधासोबत दिली जाते. आणि चवीसाठीही ही कॉफी छान लागते.

Dalgona Coffee
Dalgona CoffeeDainik Gomantak

2.कोरियन पॅनकेक (Korean Pancake) :

पॅनकेक पारंपारिकपणे, गोड आणि फ्लफी असतात परंतु कोरियन पॅनकेक चवदार आणि कुरकुरीत असतात! हे भरपूर भाज्यांनी भरलेले असतात, ज्यामुळे ते पौष्टिक नाश्ता म्हणून खाल्ले जातात. या पॅनकेकला सोया सॉस आणि मिरचीच्या फ्लेक्सची चव असते आणि ती खूप स्वादिष्ट लागते.

Korean Pancake
Korean PancakeDainik Gomantak

3. कोरियन स्टीम्ड ऑम्लेट (Korean Steamed Omelette) :

ही ऑम्लेट रेसिपी हेल्दी आणि कोरियन ट्विस्टसह येते. इतर ऑम्लेटच्‍या रेसिपीज तळून-भाजून केल्या जातात, परंतु हे ऑम्लेट वाफवलेले आहे, ज्यामुळे ते एक आरोग्यदायी पर्याय आहे. हे ऑम्लेट तिळाचे तेल, मीठ आणि साखर घालून शिजवलेले असते आणि हिरव्या कांदा आणि गाजर सारख्या भाज्यांसोबत शिजवलेले असते.

Korean Steamed Omelette
Korean Steamed OmeletteDainik Gomantak

4. कोरियन एग रोल (Korean Egg Roll) :

याला ग्यारियन मारी म्हणूनही ओळखले जाते. हे अंड्याचे रोल आपल्या भारतीयांच्या परिचयापेक्षा वेगळे आहे. फेटलेली अंडी मीठ आणि मिरपूड घालून, पॅनमध्ये चीजसह शिजवली जातात.

Korean Egg Roll
Korean Egg RollDainik Gomantak

5. किमची टोस्ट (Kimchi Toast) :

किमची हे कोरियन पाककृतीतील सर्वात लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. हे बर्‍याचदा साइड डिश म्हणून दिले जाते आणि बर्‍याच कोरियन मुख्य कोर्स डिशमध्ये देखील जोडले जाते. नाश्त्यातही किमचीचा आस्वाद घेतला जातो. टोस्ट केलेल्या ब्रेडच्या स्लाईसवर थोडी किमची टाका आणि किमची टोस्ट तयार होतो. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही क्रीम चीजचा थर देखील पसरवू शकता.

Kimchi Toast
Kimchi ToastDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com