Easy Breakfast: अनेक लोक सकाळी नाश्त्यात अंडी खातात. अंड्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. तसेच अंडी खाल्ल्याने दिवसभर पोट भरलेले राहते आणि शरीराला ऊर्जा मिळते. पण अनेक लोक घाईत असल्याने फक्त अंडी उकळतात आणि खातात. पण तुम्हाला माहितीय का अंड्यापासून झटपट तयार होणारे चविष्ट पदार्थ तयार करू शकता.
ऑम्लेट
उकडलेल्या अंड्यांऐवजी तुम्ही ऑम्लेट बनवून खाऊ शकता. अंड्याचे ऑम्लेटसोबत तुम्ही ब्रेड देखील काऊ शकता.
पराठा
पराठ्याच्या आत अंडी घालून अंड्याचा पराठा तयार करता येतो. हे खायला खूप चविष्ट आहे. तुम्ही केचपसोबतही खाऊ शकता.
अप्पे
जर तुम्हाला काही वेगळे करून पहायचे असेल, तर अंडीपासून अॅपे बनवू शकता.
एग रोल
जाता जाता खाऊ शकेल असे काही बनवायचे असेल तर एग रोल तयार करून फॉइलमध्ये गुंडाळू शकता. वाटेतही तुम्ही ते सहज खाऊ शकता.
एग तवा फ्राय
उकडलेले अंडे अर्धे कापून तव्यावर चांगले तळून घ्यावे. हे खाल्ल्याने जिभेचे चोचले नक्की पुरेल. हे बनवायला देखील सोपे आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.