Healthy Tips: फिटनेस ग्रोथ थांबली म्हणून काळजी करू नका; शरीराला रिकव्हरी टाईम देणंही गरजेचं

अनेक लोक निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी वर्कआउट करतात.
Healthy Tips
Healthy TipsDainik Gomantak

निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी अनेक लोक वर्कआउट करतात. पण सुरूवातीला वर्कआउट करतांना थोडा त्रास होतो, पण नंतर काही दिवसांनी वर्कआउट करणे सोपे होते. मग अचानक प्रोग्रेस कमी होते किंवा मंदावते. यालाच प्लेटू वर्कआउट असे म्हणतात.

वॉशिंग्टन डीसीच्या जिम कट सेव्हनचे पर्सनल ट्रेनर आणि मालक ख्रिस पेरिन म्हणतात की, वर्कआउट करून देखील तुमच्या फिटनेसवर कोणताही परिणाम दिसत नाही असे वाटणे ही एक सामान्य बाब आहे. असे तेव्हा होते जेव्हा तुमचे शरीर नवीन वर्कआउटसोबत स्वत:ला जुळवून घेत असते.

जे लोक दररोज एकच वर्कआउट रूटीन ठेवतात त्यांना प्लेटु ही समस्या जाणवत नाही. पण ज्या लोकांना आपल्या शरीरात बदल हवा असतो त्यांना ही समस्या निर्माण होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, तुमच्या वर्कआउट रुटीनमध्ये काही बदल केल्यास तुम्हाला प्लेटू समस्येला सामोरे जाण्यास मदत होऊ शकते. त्यासाठी तुमच्या शरीरातील स्नायूंना नव्या व्यायामाची सवय लावावी. काही आठवडे किंवा महिने वर्कआउटमध्ये बदल करत राहावे. वर्कआउट करण्याची पद्धत आणि विश्रांती घेण्याची वेळ बदलत राहावी. अवघड वर्कआउट न करता जास्त वेळ वर्कआउट करण्यावर भर द्यावा.

मॅरेथॉन धावपटू आणि ट्रेनर एलिझाबेथ स्कॉट यांचे म्हणणे आहे की 80% वर्कआउट मध्यम असावा. शक्ती आणि गती विकसित करण्यासाठी आठवड्यातून एक किंवा दोनदा वेगाने आणि अवघड वर्कआउट करावे. प्लेटू ही समस्या शरीराला रिकव्हर होण्यास कमी वेळ दिल्याने देखील होऊ शकते. वर्कआउटनंतर आराम, पुरेशी झोप आणि संतुलित आहार घेणे गरजेचे असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com