वास्तुशास्त्रानुसार घरात हिरवी झाडे असतील तर सकारात्मकतेचा प्रवाह वाढतो, जो प्रगती, सुख-समृद्धीसाठी मदतगार मानला जातो. पण, काही झाडे अशी असतात ज्यामुळे जीवनात अडचणी येतात. असे म्हटले जाते की अशी झाडे घराजवळ लावल्यास घरातील शांतता भंग पावते आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती थांबते. अशी कोणती झाडे आहेत जाणून घेऊया.
काटेरी झाडे
वास्तुशास्त्रानुसार घर किंवा घराच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारची काटेरी झाडे लावणे टाळावे. अशी झाडे घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच अशा वनस्पतींमुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होतात.
बाभळीचे झाड
घराभोवती कधीही बाभळीचे झाड लावू नका. वास्तुशास्त्रानुसार बाभळीचे झाड लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. कारण बाभळीच्या झाडावर काटे असतात, जे कामात अडथळा आणण्यासोबतच नकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात, घरातील सदस्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात.
बोरीचे झाड देखील अशुभ आहे
वास्तुशास्त्रानुसार बोरीच्या झाडात काटे असल्याने घरात नकारात्मकता (Negativity) वाढते. तसेच, आर्थिक संकटे येतात (Financial Problems). असं म्हटले जाते की ज्या घरात बोरीचे झाड असतं त्या घरातून लक्ष्मी देवी नाखुश होते आणि निघून जाते.
लिंबू आणि आवळा
अनेकदा लोक आपल्या घरात किंवा बागेत आवळा आणि लिंबाची झाडे लावतात. पण वास्तुशास्त्रानुसार ही दोन्ही झाडे शुभं मानली जात नाहीत. जर तुमच्या घरात किंवा घराबाहेर लिंबू किंवा आवळ्याचे झाड असेल तर ते काढून टाका, कारण त्यांच्यामुळे घरातील त्रास आणि तणाव (stress and tension) वाढतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.