Vastu Tips: घरातील तिजोरीचं तोंड चुकीच्या दिशेला ठेवल्यास लक्ष्मी होईल नाराज

वास्तुशास्त्रामध्ये घरातील आर्थिक परिस्थिति चांगली राहण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत.
Vastu Tips
Vastu TipsDainik Gomantak
Published on
Updated on

घरात सकारात्मक वातावरण आणि आर्थिक स्थिती चांगली राहण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितले आहेत. पण घरात कोणताही दोष असल्यास श्रीमंत माणसाला कंगाल व्हायला वेळ लागत नाही.यामुळे घरातील वातावरण नकारात्मक बनतं, भांडणं होऊ लागतात. घरातील लक्ष्मी नाराज होऊ शकते. त्यामुळे घरातील तिजोरी कोणत्या दिशेने असवई याला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. (Vastu Tips News )

वास्तुशास्त्रानुसार (Vastushtra) घरातील तिजोरीचं तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेलाच असावे. कारण ही दिशा कुबेरची मानली जाते. या दिशेने तिजोरी ठेवल्यास घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. या दिशेला तोंड करून ठेवलेली तिजोरी नेहमी संपत्तीने भरलेली असते. तर पश्चिम किंवा दक्षिण दिशेला तोंड करून ठेवलेल्या घरात पैसा राहत नाही. माणसाने कितीही पैसा कमावले तरी त्याचा पैसा (Money) रात टिकून राहत नाही किंवा माणसाच्यावरील कर्ज वाढत जाते.

Vastu Tips
Easter 2022| इस्टरला घ्या गोव्याच्या चटपटीत पदार्थांचा स्वाद

या चुकाही टाळल्या पाहिजे

* वास्तुशास्त्रानुसार तिजोरीजवळ चुकूनही झाडू ठेवू नये. असे केल्याने मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

* संध्याकाळी देवी लक्ष्मीच्या घरी आगमनाची वेळ असल्याने घर झाडू नये.

* स्वच्छतेचे काम नेहमी दिवसा करा.ईशान्येकडे कचरा कधीही लावू नका. कारण हा सर्वात शुभ कोन मानला जातो.

* घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कचरा ठेवू नका.

* रोज संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर तुपाचा दिवा लावावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com