

नवी दिल्ली : उन्हाळ्यात (Summer) आंबे (mango) मोठ्या प्रमाणात मिळतात. आंब्याच्या खास चवीमुळे त्याला फळांचा राज्य म्हटले जाते. आंब्याचे सेवन करण्याचे बरेच फायदे आहेत, परंतु आंबे खाल्ल्यानंतर काही पदार्थ असे आहेत जे खाल्ल्यास तुम्हाला पोटदुखी, पित्त, वायु आणि आतड्यांमधे संसर्ग होण्याचा धोका वाढतो जो गंभीर असू शकतो. (Do not eat cold drinks, yogurt after eating mango; Otherwise ...)
आंबा खाल्ल्यानंतर खाऊ नका 'हे' पदार्थ
आंबे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नाक. खरं तर, आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे पोटदुखी, वायू आणि आम्ल तयार होते. हे वारंवार केल्याने आतड्यांमधे संसर्ग होण्याचा धोकाही वाढतो, जो गंभीर असू शकतो. आंबे खाल्ल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावे.
आंबा खाल्ल्यानंतर ताबडतोब कोल्ड्रिंक पिणे देखील आरोग्यासाठी हानिकारक आहे. आंब्यात नैसर्गिकरित्या बरीच साखर आढळते आणि कोल्ड ड्रिंकमध्येही भरपूर साखर असते. अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल तर आंबा आणि कोल्ड ड्रिंकचे संयोजन त्यांच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते.
आंबा खाल्ल्यानंतर लगेचच दही खाणेही चुकीचे आहे. वास्तविक आंबा आणि दही एकत्र खाल्ल्याने आपल्या शरीरात कार्बन डाय ऑक्साईड अधिक बनतो. ज्यामुळे शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात.
आंब्याच्या नंतर करल्याचे सेवन करणे देखील योग्य नाही. , आंबा खाल्ल्यानंतर लगेच जर तुम्ही कारले खाल्ले तर तुम्हाला मळमळ, उलट्या आणि श्वासोच्छवासाच्या समस्या उद्भवू शकतात.
मिरची आणि मसाले स्वयंपाकात वापरली जातात, परंतु जर तुम्ही आंबे खाल्ले असेल आणि तुम्ही लगेचच मसालेदार पदार्थ किंवा मिरची खाल्ली तर तुम्हाला पोट व त्वचेचे आजार होऊ शकतात. म्हणून, जर तुम्ही आंबे खाल्ले तर वरील गोष्टींचे सेवन करु नका.
(नोट : येथे नमूद केलेल्या गोष्टी सामान्य माहितीवर आधारित आहेत. तुम्हाला अशा काही आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ला घ्या)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.