Diwali Photoshoot Tips: यंदा दिवाळीत करा हटके फोटोशूट, लाइक्सचा होईल वर्षाव

या टिप्स फॉलो करून तुम्ही सोशल मिडियावर फोटो पोस्ट केल्यास तुमच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव होईल.
Diwali Photoshoot Tips:
Diwali Photoshoot Tips:Dainik Gomantak

Diwali Photoshoot Tips: दिवाळी दिव्याचा सण म्हणून साजरा केला जातो. यादिवशी माता लक्ष्मीची मनोभावे पुजा केली जाते. तसेच अनेक लोक दिवाळीला फोटोशुट करतात. पण फोटो सुंदर आणि आकर्षक येण्यासाटी कोणत्या टिप्स फॉलो कराव्या हे जाणून घेऊया. या टिप्स फॉलो करून तुम्ही सोशल मिडियावर फोटो पोस्ट केल्यास तुमच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव होईल.

दिवाळीत फोटो काढण्यासाठी तुमच्याकडे कॅमेरा असलाच पाहिजे असे नाही. तुम्ही मोबाइलमध्ये देकील सुंदर फोटो काढू शकता.

कॅमेरामधील फिचर

सर्वप्रथम, तुमच्या फोनच्या कॅमेऱ्याचे सर्व फिचर्स नीट समजून घ्यावे. आजकाल बहुतेक स्मार्टफोन्समध्ये कॅमेरा फीचर्ससह येतात. तुमच्या कॅमेर्‍याचा ऑटो मोड कसा फोकस करतो आणि पलाइट एक्सपोजर कसा कॅप्चर करतो हे पाहण्यासाठी तपासावे. तुम्ही स्क्रीनवर क्लिक करून फोकस पॉइंट चेक करू शकता.

कॅमेरा HDR

फोटो काढताना कॅमेरा HDR किंवा हाय डायनॅमिक रेंज मोडमध्ये ठेवावा. हे जवळजवळ प्रत्येक स्मार्टफोनमध्ये येते. हे डार्क आणि लाइट भागात एक्सपोजर संतुलित करते. हे लँडस्केप फोटोंसाठी खूप उपयुक्त आहे.

कॅमेरा स्थिर ठेवावा

तुम्ही खुप वेळ फोटो काढत असाल, तर मोशन ब्लर किंवा हलणारे फोटो टाळण्यासाठी कॅमेरा स्थिर ठेवण्यासाठी सपाट पृष्ठभागावर ठेवावा. तुम्ही मोबाईल ट्रायपॉड देखील वापरू शकता.

तुमच्या फोनच्या फ्लॅशचा अधिक चांगला वापर करा

अंधारात फ्लॅश वापरल्याने तुमचा फोटो वॉशआउट होऊ शकतो. परंतु असे असूनही, आपण काही टिप्स वापरून ते कमी करू शकता. पलाइट कमी करण्यासाठी आपल्या फ्लॅशवर टिश्यू किंवा कागद ठेवावे किंवा कलर फिल्टर लावावा. जर तुम्हाला जवळ ठेवलेली एखादी गोष्ट हायलाइट करायची असेल, तर फ्लॅश वापरल्याने तुम्हाला बरे वाटेल.

फ्रेम नीट घ्यावी

चांगला फोटो येण्यासाठी चांगली फ्रेम घेणे गरजेचे आहे. तुमच्या फोटोची चौकट समजून घ्या. तुम्ही दिवे, रांगोळी जवळ फोटो क्लिक करू शकता.

फोटो एडिटिंगसाठी चांगले अॅप्स वापरावे

खरे सांगायचे तर आजकाल कोणताही फोटो एडिट केल्याशिवाय पोस्ट करत नाही. तुम्हाला स्मार्टफोनने काढलेले फोटो एडट करावे लागतील. यासाठी अनेक चांगले अॅप उपलब्ध आहेत. तुम्ही Flickr, Snapseed, Lightroom सारख्या अॅप्सची मदत घेऊन फोटो एडिट करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com