पणती तेवते घरोघरी, सुखसमृद्धी नांदते दारी

शास्त्र, इतिहास आणि परंपरेचा सन 'दिवाळी'
Happiness and prosperity
Happiness and prosperityDainik Gomantak

प्रभु श्रीराम सिता माई आणि भ्राता लक्ष्मण जेव्हा 14 वर्षांचा वनवास भोगुन अयोध्याला घरी परत येतात तेव्हा सर्व प्रजा 'दिपोत्सव' करते आणि तेव्हा पासुन दिवाळी सन साजरा केला जातो. दीपावलीच्या दिवशी, सुख, संपत्ती आणि समृद्धीसाठी घरामध्ये दिवे लावावेत. घराला प्रज्वलीत करण्यासाठी मातीपासून बनवलेल्या दिव्याला दीपावलीच्या सना मध्ये समृद्धीचे प्रतीक मानले जाते. अज्ञानाच्या अंध:कारातुन ज्ञानाच्या प्रकाशा कडे नेणारा सन म्हणजे दिवाळी. परिवारातील प्रत्येक सदस्याने एकत्र येऊन आनंदाने सन साजरे करावे.

दीपावलीच्या दिवशी पनत्यांमध्ये मोहरीचे तेल वापरावे, असे केल्याने घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होते, सुख, शांती आणि संपत्ती वाढते. हे तेलाचे दिवे घराच्या दक्षिण-पूर्व कोपऱ्यातून ठेवायला सुरुवात करावी आणि दक्षिण-पश्चिम कोपऱ्यापर्यंत ठेवावे, म्हणजेच घरात पहिला दिवा दक्षिण दिशेला लावावा, नंतर पश्चिम दिशेला. अशाप्रकारे दक्षिण आणि आग्नेय कोपऱ्यात दिवा लावल्यानंतर घराच्या पूर्व दिशेला दिवा लावावा.

Happiness and prosperity
...म्हणून मुक्या जिवांसाठी धोकादायक ठरते दिवाळी

सर्वात शेवटी घराच्या उत्तर दिशेला दिवा लावावा. जास्तीत जास्त दिवे दक्षिण दिशेला ठेवावेत, त्यापेक्षा कमी दिवे पश्चिम दिशेला ठेवावेत, कमी दिवे पूर्व दिशेला ठेवावेत आणि कमीत कमी दिवे उत्तर दिशेला ठेवावेत. या क्रमाने दिवा ठेवल्याने शुभ गोष्टी घरामध्ये घडतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com