Diwali 2023: दिवाळीत विविध प्रकारचे दिवे लावण्याचे आहेत खास फायदे

दिवाळी हा दिव्याचा सण ओळखला जातो. यंदा दिवाळी 12 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे.
Diwali 2023
Diwali 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Diwali 2023: यंदा दिवाळी १० नोव्हेंबरपासून साजरी केली जाणार आहे. हा सण अमावस्येला साजरा केला जातो, या दिवशी अनेक उपाय केले जातात. या दिवशी केवळ मातीचे किंवा तेलाचे दिवे नव्हे तर अनेक प्रकारचे दिवे लावले जातात.  प्रत्येकाचे वेगवेगळे महत्त्व आहे, म्हणून या विविध प्रकारचे दिवे लावण्यामागे कोणते कारण आहे हे जाणून घेऊया.

पिठाचा दिवा

दिवाळीनिमित्त घरोघरी पिठापासून बनवलेले दिवे लावले जातात. पिठापासून बनवलेले दिवे लावल्यास साधना आणि सिद्धी प्राप्त होते. सर्व प्रकारच्या दिव्यांमध्ये हे सर्वोत्कृष्ट मानले जाते.

तुपाचा दिवा

जीवनातील आर्थिक अडचणींपासून मुक्त होण्यासाठी तुपाचा दिवा लावाला जातो. गाईच्या तुपाचा वापर दिवाळीच्या रात्री माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी किंवा अखंड ज्योतीसाठी दिवे लावण्यासाठी केला जातो.

मोहरीच्या तेलाचा दिवा

शत्रूंपासून बचाव करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो. याशिवाय सूर्यदेवाच्या आशीर्वादासाठी मोहरीच्या तेलाचा दिवा देखील शुभ मानला जातो.

तिळाच्या तेलाचा दिवा

शनि ग्रहापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि जीवनात त्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तिळाच्या तेलाचा दिवा लावु शकता.

तीन मुखी दिवा

संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि भगवान हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी तीनमुखी किंवा कोपऱ्यात चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा.

तीन वाती असलेला दिवा

श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी तीन वाती आणि तूप घालून दिवा लावणे शुभ मानले जाते.

चारमुखी दिवा

भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी चतुर्मुखी दिवा मोहरीच्या तेलाने भरून त्यात चार वाती टाकून भगवान शंकरासमोर जाळून दुःखापासून मुक्तीसाठी प्रार्थना करावी.

पंचमुखी दिवा

कोणत्याही प्रकारचा खटला किंवा न्यायालयीन कारवाई जिंकण्यासाठी पाच मुखी दिवा लावावा, यामुळे भगवान कार्तिकेय प्रसन्न होतात.

सातमुखी दिवा

माता लक्ष्मीचा शाश्वत आशीर्वाद सुनिश्चित करण्यासाठी, हा सात मुखी दिवा दिवाळीला तिच्यासमोर लावला जातो.

आठ आणि बारा मुखी दिवा

भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हा दिवा लावला जातो. या दिव्याला आठ-बारा मुखे असतात, त्यात मोहरी किंवा तूप भरून ते पेटवले जातात.

सोळा वाती असलेला दिवा

भगवान विष्णूसाठी सोळा वाती दिवे लावले जातात. असे केल्यास अनेक समस्या दूर होतात.

गोल दिवा

यश मिळवण्यासाठी आणि ज्ञान मिळवण्यासाठी गोल आणि खोल दिवे लावले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com