Sister Curse Brother on Bhai Dooj : काय सांगता? याठिकाणी भाऊबीजेला बहिणी भावांना देतात शाप; काय आहे ही प्रथा जाणून घ्या

Sister Curse Brother on Bhai Dooj : देशात आजही अनेक अनोख्या प्रथा पाळल्या जातात, ज्याबद्दल जाणून तुम्ही थक्क व्हाल.
Sister Curse Brother on Bhai Dooj
Sister Curse Brother on Bhai Dooj Dainik Gomantak
Published on
Updated on

भारत जगभरात विविध सण आणि चालीरीतींसाठी प्रसिद्ध आहे. देशात आजही अनेक अनोख्या प्रथा पाळल्या जातात, ज्याबद्दल जाणून तुम्ही थक्क व्हाल. छत्तीसगडसह भारतातील काही ठिकाणी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या भाईबीजेच्या दिवशी एक विलक्षण परंपरा पाळली जाते. भाऊबीज हा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो.

Sister Curse Brother on Bhai Dooj
Diwali Bhaubeej 2022 Date and Time : यंदा 2 दिवस असणार भाऊबीज; जाणून घ्या दोन्ही दिवसांचे शुभ मुहूर्त आणि महत्व

हा सण देखील रक्षाबंधनाप्रमाणे साजरा केला जातो ज्यामध्ये बहिणी आपल्या भावाला टिळक लावतात आणि सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. पण काही ठिकाणी बहिणी भावांना मरणाचा शाप देतात.

हे जाणून तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण हे पूर्णपणे सत्य आहे. भावांना शाप दिल्यानंतर बहिणींनीही त्याचे प्रायश्चित करायचे असते. वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा आहे. चला जाणून घेऊया ही कोणत्या प्रकारची परंपरा आहे आणि ती कोणत्या राज्यात साजरी केली जाते?

ही अनोखी परंपरा छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात पाळली जाते. या परंपरेनुसार बहिणी आपल्या भावांना मरणाचा शाप देतात. छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यात एका विशिष्ट समुदायाचे लोक ही परंपरा पाळतात. मुली आपल्या भावांना मरण्याचा शाप देतात आणि हे भाईबीजेच्या दिवशी केले जाते. भाईबीजेच्या दिवशी सकाळी उठल्यावर बहिणी आपल्या भावांना शाप देतात. याचे प्रायश्चित करण्यासाठी बहिणी आपली जीभ काट्याने टोचतात.

या वेळी मुली यमलोकाच्या मूर्ती बनवून त्यांचा चुराडा करतात. भाऊबीजेच्या दिवशी या परंपरेचे पालन केल्यास यमराजाचे भय राहत नाही, असे मानले जाते. एका आख्यायिकेत त्याचा उल्लेख आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com